
नांदेड। पोलिस स्टेशन शिवाजीनगर येथील गुन्हे शोध पथकांने श्री रामनवमी मिरवणुकीत उत्कृष्ट कामगीरी करत दोन आरोपीतांना ताब्यात घेवुन ६६,००० रूपयाचे ६ मोबाईल जप्त केले आहेत.


दिनांक ३०/०३/२०२३ रोजी नांदेड शहरामध्ये श्री रामनवमी निमीत्य चालु असलेल्या मिरवणुकीत जनतेच्या अलोट गर्दीमध्ये होणा-या अप्रिय घटनेवर प्रतिबंध घालण्याकरीता पोलीस अधीक्षक साहेब, नांदेड, अपर पोलीस अधीक्षक साहेब, नांदेड, तसेच उप विभागीय पोलीस अधिकारी नांदेड शहर यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक मोहन भोसले पो.स्टे शिवाजीनगर यांनी साधे कपडयात अधिकारी व कर्मचारी यांना नेमुण लक्ष ठेवण्याबाबत सुचना दिल्या होत्या.


त्यानुसार श्री रामनवमीचे मिरवणुकीत बंदोबस्त करीत मोबाईल चोरांवर व संशयीत लोकांवर लक्ष ठेवुन मिळालेल्या गोपनिय माहितीचे आधारे ०१. संदीप उर्फ जबरन सुभाष मगरे वय २० वर्ष रा. जयभिमनगर नांदेड आरोपी क. ०२. अमोल गंगाधर भालेराव वय ३० वर्ष रा. जयभिमनगर नांदेड यांना ताब्यात घेवुन त्याचे कडुन वेगेवगळया कंपनीचे अॅन्ड्राईड ०६ मोबाईल किमंत ६६,०००/- चे जप्त करून पो.स्टे शिवाजीनगर येथु गुरन ९७ / २०२३ कलम ३७९, ३४ भादंवि प्रमाणे गुन्हा दाखल करून चांगली कामगीरी केली.


सदरची कामगीरी पोलीस अधीक्षक नांदेड, श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रसेन देशमुख, पोलीस निरीक्षक मोहन भोसले, पोलीस स्टेशन शिवाजीनगर यांचे मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी गुन्हे शोध पथकातील पोलीस उप निरीक्षक मिलींद सोनकांबळे, अमलदार शेख इब्राहीम, दिलीप राठोड, रविशंकर बामणे, देवसिंग सिंगल, शेख अझहर, दत्ता वडजे, विष्णु डफडे यांनी पार पाडली.
