
नायगाव, रामप्रसाद चन्नावार। मनुष्य विचार प्रधान असलेला प्राणी आहे, परंतु निर्थक विचार करून जिवाला दुःखी करतात, आणि ज्यातून समाधान प्राप्त होत नाही.म्हणून नेहमी सकारात्मक विचार करावा तर आपले जीवन सुखी होईल असे प्रतिपादन बाल कीर्तनकार ह.भ.प.दिव्या उर्फ वैशाली शेळके येलूरकर यांनी केले.


मांजरम ता.नायगाव येथे हनुमान जन्म उत्सवा निमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.दरम्यान दररोज काकडा, तुकाराम गाथा वाचन, गाथा भजन, हरिपाठ,व रात्री हरी कीर्तन ,हरी जागर असे कार्यक्रम सुरू आहेत, शुक्रवार ३१ मार्च रोजी बाल कीर्तनकार दिव्या उर्फ वैशाली शेळके यांनी क्षणो क्षणी हाची करावा विचार ,तरावया पार भवसिंधु ह्या अंभगावर सुश्राव्य चिंतन केले, काही गोष्टींचा विचार कधीच करू नये, काही गोष्टींचा विचार कधी कधी करावा, काही गोष्टींचा विचार मात्र सतत करावा, निर्थक विचार दुःखाला कारणीभूत ठरतो, संपत्ती,संगती, संतती याच विचार कधी कधी करावा, संसार रूपी सागरातून तरूण जाण्याचा विचार नेहमीकरावा असे प्रतिपादन शेळके यांनी केले.


यावेळी बाल गायीका वैष्णवी काशीनाथ पानचावरे हीचे सुश्राव्य गायन झाले,गायणाचार्य विठ्ठल पांचाळ, विकास भुरे, मिराताई शेळके, नायटे ताई, विठ्ठलराव कत्ते, व्यंकटराव कासराळीकर,, नायटे मृदंगाचार्य शुभम माली पाटील, माधवराव शिंदे, चंद्रकांत शिंदे, अनंतराव मंगनाळे, माधव नायटे, राजेश पांचाळ, विठ्ठल डांगे, यांच्या सह येलूर,सलगरा व मांजरम येथील महिला पुरुष भजनी मंडळ उपस्थित होते.

