
नांदेड| महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या संकल्पनेतून १ एप्रिल ते १ मे २०२३ हा कालावधी समता पर्व म्हणून साजरा करण्यात येत आहे. या समता पर्वाचे उद्घाटन नांदेड येथे १ एप्रिल रोजी बंदा घाट येथे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी सामाजिक न्याय विभागाने राबविलेल्या विविध योजनांची आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांची यशोगाथा असलेल्या पुस्तिकेचे विमोचन त्यांच्या हस्ते करण्यात आले.


यावेळी आमदार राजेश पवार, खासदार प्रताप पाटील चिखलीकर, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर घुगे, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, मनपा आयुक्त सुनील लहाने, समाज कल्याण आयुक्त डॉ. तेजस माळवदकर, जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार, दिलीप कंदकुर्ते, प्रवीण साले, चैतन्य बापू देशमुख, समाज कल्याण अधिकारी बापू दासरी यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मुगाजी काकडे, नायब तहसीलदार यांनी तर सूत्रसंचालन प्रा. निवृत्ती कौसल्ये यांनी केले.

