
नवीन नांदेड| कृषि उत्पन्न बाजार समिती नांदेडचे बिगुल वाजलेले असताना सर्व उमेदवारांचे आप आपले नामनिर्देशन पत्र दाखल करून मतदानाची जुळवाजुळव करण्यात सर्व व्यस्त झाले आहेत . त्यातच नांदेड दक्षिण मतदारसंघातील वाजेगाव सर्कल मधील सेवा सोसायटी मधून गोविंदराव दत्तराम जाधव यांनी आपले नामनिर्देशन दाखल केले आहे.


गोविंदराव जाधव हे गेल्या ३५ वर्षांपासून गावातील ग्रामपंचायत ही त्यांच्या मार्गदर्शनात बिनविरोध निवडून येत आहे आणि त्यांनी २५ वर्ष सरपंच पदी निवडून येण्याचा मान सुद्धा मिळवला आहे त्यांच्या हातून गावातील शेकडो विकास कामे मार्गी लागले आहेत तसेच वाजेगाव सर्कल मधील बहुतांशी कामे व निर्णय देखील त्यांच्या योगदानातून च होतात व त्यांना काँग्रेस चे निष्ठावंत व अशोकरावजी चव्हाण साहेब यांचे निकटवर्तीय समजले जाते. याचीच सांगड घालत असताना गोविंदराव जाधव यांच्या बरोबर त्यांचे सुपुत्र दत्ता जाधव हे देखील सरपंच संघातून आपले नामनिर्देशन दाखल करून कृषि उत्पन्न बाजार समितीच्या आखाड्यात उतरले आहेत.


दत्ता जाधव हे उच्च शिक्षित नांदेड जिल्ह्यातील सर्वात तरुण सरपंच म्हणून ओळखले जातात त्यांची कार्यशैली ही अतिशय चांगल्या प्रकारची असल्याने सर्कल मधील सर्व गावा गावामधून त्यांचीच चर्चा नेहमी चालत असते दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्या कडे शेतकरी चळवळीतील उमदा कार्यकर्ता नेता या भावनेने लोक पाहतात ते गेल्या १२ वर्षांपासून विखे पाटील कृषी परिषद मध्ये जिल्हाध्यक्ष म्हणून काम करतात. त्यांच्या हातून नेहमीच जिल्हाभरील गोर गरिबांचे कामे घडून येतात हाकेला साथ देणारा नेता म्हणून त्यांची ओळख निर्माण होते आहे. आता औचित्याची गोष्ट म्हणजे हा पिता पुत्रांचा एकाच वेळी निवडणूक लढवण्याचा संयोग नांदेड दक्षिण मतदार संघातील तसेच जिल्हाभरातील लोकांना पाहायला मिळणार आहे, पिता पुत्रांचे असलेले काम व त्यांचे नातेवाईक मित्र मंडळी हे विविध सोसायट्या आणि ग्रामपंचायत वर असलेले वर्चस्व पाहता सध्या तरी पिता पुत्रांचा बोलबाला चालत आहे .

