
नांदेड| पाणी, वृक्ष आदी नैसर्गिक संपत्तीचे जतन करून ते पुढच्या पिढीला हस्तांतरित करणे ही आपली जबाबदारी आहे, असे प्रतिपादन नांदेड जिल्हा परिषदेच्या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले.


मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त वाडी बुद्रुक येथे रामा क्राउड सोसायटी व परमविश्व फाउंडेशनच्या वतीने वर्षाजल पुनर्भरण तथा रेन वॉटर हार्वेस्टिंगचे उद्घाटन आज शुक्रवार दिनांक 31 मार्च रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी गट विकास अधिकारी राजेश मुक्कावार, एमजीएम पत्रकारिता महाविद्यालयाचे प्राचार्य तथा लोकपात्रचे आवृत्ती संपादक डॉ. गणेश जोशी, प्रताप पावडे, विठ्ठल पावडे, जिल्हा परिषदेचे जनसंपर्क अधिकारी मिलिंद व्यवहारे, प्रा. संतोष चांडोळे, प्रा. परमेश्वर पौळ, विस्ताराधिकारी जीवन कांबळे, रमेश पावडे, माधव पावडे, नारायण चव्हाण, रामकिशन शिंगाडे आदींची उपस्थिती होती.


पुढे त्या म्हणाल्या, नांदेडला नदी आणि विष्णुपुरी प्रकल्पामुळे पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणात भासत नाही. परंतु असलेला पाण्याचा योग्य ते व काटकसरीने वापर करणे महत्त्वाचे आहे. पावसाचा एकन ऐक थेंब जमिनीमध्ये मुरवण्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग, घर तेथे शोषखड्डे, विहीर पुनर्भरणाचे उपक्रम हाती घेणे काळाची गरज आहे. मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या अमृ महोत्सवी वर्षा निमित्त नांदेड जिल्हा परिषद अमृतधारा उपक्रम राबवणार असून यामध्ये पाणी पुनर्भरणावर भर दिला जाणार असल्याचेही मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर- घुगे यांनी सांगितले.


यावेळी वाडी ग्रामपंचायत व रामा क्राउड सोसायटीच्या वतीने उपस्थिततांचा शाँल व बुके देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डॉ. परमेश्वर पौळ यांनी केले. सूत्रसंचालन गजानन जाधव यांनी तर उपस्थित आमचे आभार डॉ. गणेश जोशी यांनी मांनले. या कार्यक्रमाला वर्षा पौळ, स्वाती शिरसकर, मंजुषा कदम, शिवमाला भलेराव, अर्पणा जाधव, स्मीता डांगे, बंदना राठोड, स्नेहा बेलूरकर, रामा क्राउड सोसायटीचे सदस्य, वाडी ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ यांची मोठया संख्येने उपस्थिती होती.
