
नायगाव, रामप्रसाद चन्नावार। नायगाव तालुक्यातील प्रसिद्ध असलेले तीर्थक्षेत्र महादेव मंदिर गंगणबीड (तलबीड) येथे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी बारस यात्रे निमित्त शिवपार्वतीचा विवाह सोहळा व कावड पालखी मिरवणूकीचे आयोजन केले आहे. अंबली- बारशी यात्रेनिमित्य शिवपार्वती विवाहसोहळा, यात्रा,भजन, किर्तन व शिवजागर ई.कार्यक्रमाचे रविवारी 2 एप्रिल रोजी आयोजन केले आहे.


रविवारी सायंकाळी गावातील मुख्य रस्त्याने महाराष्ट्राचे पारंपरिक वाद्य हलगी-सनई, ढोली-बाजा बँड पथक, भजनी मंडळे या वाद्यवृंदाच्या गजरात पालखी मिरवणुक निघाली तर संध्याकाळी 9 वाजता सदरील पालखी तिर्थक्षेत्र श्री महादेव मंदिर परिसरात पोहचेल. संध्याकाळी पालखी शंभु महादेव मंदिरात पोहचल्यावर स्वामीजींच्या हस्ते विधीवत शिवपार्वतीचा महाभिषेक होणार असून नंतर ९.४५ वा. शिवपार्वतींचा विवाहसोहळा मोठ्या उत्साहात आणि थाटमाटात संपन्न होणार आहे.


त्यानंतर रात्रभर प्रवचन व शिवभजन शिवजागर होईल. सोमवारी तीन एप्रिल रोजी रोजी सकाळी सात वाजता महादेवाची आंबील { महाप्रसाद } होणार आहे. नंतर मंदिर परिसरात दिवसभर यात्रा भरेल. पंचक्रोशीतुन काठ्या-कावड्या घेऊन येणाऱ्या सर्व भाविकांसाठी पालखी दर्शन खुल्ले करण्यात आले. महाराष्ट्रासह आंध्रप्रदेश, कर्नाटक राज्यातून हजारो भाविक येथे येत असून प्रेत्येक उत्सवला मोठी गर्दी येथे जमते.

