
कंधार, सचिन मोरे। भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये महत्वपूर्ण योगदान देत ज्यांनी दोन वेळेस काळ्या पाण्याची शिक्षा भोगली आणि देशाच्या स्वातंत्र्यांमध्ये आपले आयुष्य खर्ची घातले असे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनाचा गौरव करणारी गौरव यात्रा लोहा कंधार विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावामध्ये जाणार असून त्यांचे स्वागत ठिकठिकाणी केले जाणार आहे. त्या यात्रेतून सावरकरांचे विचार येणाऱ्या पिढीपर्यंत पोहोचून सावरकरांच्या विचारातुन देशभक्ती येणाऱ्या पिढीमध्ये भिनली जाईल असे प्रतिपादन सावरकर गौरव यात्रेच्या उद्घाटन प्रसंगी महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष प्रणिताताई देवरे -चिखलीकर यांनी कंधार येथे केले


भारतीय जनता पार्टी कंधार आयोजित स्वतंत्रवीर गौरव यात्रा १ एप्रिल ते ६ एप्रिल पर्यंत कंधार लोहा तालुक्यातील गावागावात स्वातंत्रवीर गौरव यात्रा जाणार आहे .नांदेड भाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पा.गोजेगावकर यांच्या हस्ते स्वातंत्र्यवीर गौरव यात्रेचा शुभारंभ करण्यात आला. ही यात्रा भाजपा जिल्हा सरचिटणीस व कंधार लोहा विधानसभेचे प्रमुख प्रवीण पा.चिखलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली सदरील यात्रा पार पडणार आहे.


कार्यक्रमाच्या सुरुवातीस स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. सदरील यात्रेच्या दरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कार्याची माहिती,त्यांनी केलेला त्याग,सेवा,समर्पण तसेच सावरकरांनी देश स्वातंत्र्यासाठी दिलेला लढा व त्यांच्या कार्याचा यात्रेच्या माध्यमातून गौरव करण्यात येणार आहे.


यावेळी उपस्थित भाजपा जिल्हा सरचिटणीस गंगाधरजी जोशी,महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष चित्राताई गोरे,जिल्हा उपाध्यक्ष शिवराज पा.माळेगावे,युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस रोहित पाटील, शिवसेना उप जिल्हाप्रमुख मारोती पंढरे,कंधार भाजपा तालुकाध्यक्ष भगवान राठोड, लोहा भाजपा तालुकाध्यक्ष आनंदराव पा.शिंदे, कंधार शिवसेना तालुकाप्रमुख धनराज लुंगारे, शहराध्यक्ष ॲड.गंगाप्रसाद यन्नावार, सरचिटणीस विनोद तोरणे ,चेतन केंद्रे,मधुकर डांगे, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष निलेश गौर ,युवा मोर्चा तालुकाध्यक्ष साईनाथ कोळगिरे, महिलामोर्चा सरचिटणीस कल्पना गीते, स्मिताताई बडवणे माजी नगरसेवक मीनाताई मुखेडकर,आसिफ शेख, अड सागर डोंगरजकर, युवा सेना शहराध्यक्ष श्रेयस लाठकर, ,बालाजी तोरणे,बालाजी तोटावाड ,व्यंकट नागलवाड, व्यंकट मामडे याच्यासह भाजपा शिवसेनेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी स्वतंत्र्यवीर गौरव यात्रेच्या रथास घोडजकडे मार्गस्थ केले. याप्रसंगी प्रस्ताविक तालुका अध्यक्ष भगवान राठोड यांनी केले तर सूत्रसंचलन ॲड. गंगाप्रसाद यन्नावार यांनी केले.
