
नविन नांदेड| शिवलिंगेश्वर मंदिर सिडको येथे २ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता शिवपार्वती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी शिवभक्त सेवा मंडळ व समाज बांधव सिडको यांच्या वतीने २६ मार्च ते २ एप्रिल रोजी अखंड शिवनाम सप्ताहाची सांगता गुरू राजशेखर शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या प्रवचनानी झाली या वेळी मोठ्या प्रमाणात भाविक भक्तांची व महिलांच्यी मोठ्या संख्येने ऊपसिथीत होती.


अंखड शिवनाम सप्ताह निमित्ताने किर्तन व प्रवचन यासह दैनंदिन कार्यक्रम चे आयोजन करण्यात आले होते तर २ एप्रिल रोजी शिव पार्वती विवाह सोहळा मंदिराचे मुख्य पुजारी सन्मुख महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली शिव पार्वती विवाह सोहळा मंगलाष्टके गाऊन संपन्न झाले ,यावेळी महाआरतीने ,भजन, महाप्रसादने सांगता करण्यात आली. या शिवनाम सप्ताहात गुरुवर्यांचे अमृतोपदेश झाले .यात श्री गुरु १०८ ष.ब्र. डॉ. नंदीकेश्वर शिवाचार्य महाराज, लासीन मठ, पुर्णा, श्री गुरु राजशेखर शिवलिंग शिवाचार्य महाराज, वीरमठ, अहमदपुर आचार्य गुरुराज स्वामी,भक्तीस्थळ अहमदपुर यांच्या आशीर्वादाने शिवरुद्राभिषेक, परमरहस्य याचे सामुदायीक पारायण प्रवचन,मन्मय गाथा भजन रात्री किर्तन शिवजागर.


शि.भ.प.सौ.कावेरी ताई मुदखेडे, संगमेश्वर बिरादार,धनराज बुलबुले, मन्मथ अप्पा डांगे,लक्षमण विभुते,सौ.किरती ताई स्वामी, शिवशरण ,श्रीराम देशमुख,मोहनराव कावडे यांच्या किर्तन तर शि.भ.प.सौ.सुरेखाताई किडे ,सौ.संगिता कराहळेकर,राम भुरे पेटंर,सौ.सत्यभामा यैजगे, प्रा.डॉ.शशीकांत दुर्ग, प्राचार्य, धाराशिव शिराळे, त्रिनेत्र स्वामी, परमेश्वर कार्लकर, यांच्ये किर्तन आयोजित करण्यात आले होते, शिवपार्वती सोहळ्याला परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी गुरूराजशेखर शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचे अमृतापदेशाने झाला, व उपस्थित भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. या अखंड हरिनाम सप्ताह यशस्वी साठी मनोहर धोडे,वैजनाथ देशमुख, सुदर्शन कांचनगिरे, पंदरगे , भगवान साखरे,गोरे, कार्लेकर, करणे, सोप्पा, सदाशिव माताळ,श्रीराम देशमुख, राम भातांबरे, सरस्वती कांचनगिरे, सौ. देशमुख, सौ. माताळ, सुरेखा साखरे, यांच्या सह विश्वस्त पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.

