
नांदेड। महाविकास आघाडी तर्फे छत्रपती संभाजी नगर येथे काल अति विराट जाहीर सभेत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी शिंदे गट व भाजप वरची टीका जिव्हारी लागल्यामुळे शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी अशोक चव्हाण यांच्यावर बिन बुडाचे आरोप करत पुडी सोडली. असल्याची प्रतिक्रिया शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे चे संपर्क प्रमुख प्रकाश मारावार यांनी केले.


महाविकास आघाडी तर्फे राज्यात सर्वप्रथम छत्रपती संभाजी नगर अति विराट जाहीर सभा झाली त्यानंतर नागपूर नाशिक पुणे मुंबई या ठिकाणी अति विराट जाहीर सभेतून शिंदे गट व भाजप यांच्या कार्यालय प्रणालीवर जोरदार टीका तसेच शिंदे गटाने कशाप्रकारे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या पाठीत खंजीर खुपसून सत्तेत आला याची जाहीर वाच्येता महाविकास आघाडीतील नेते करत असल्यामुळे शिंदे गटाच्या जिवारी लागत आहे काल छत्रपती संभाजी नगर येथे महाविकास आघाडीच्या जाहीर सभेत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब यांनी पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना कशाप्रकारे स्वायत्ता दिली व संयमी. विश्वासू सर्वांना घेऊन चालणारे नेतृत्व उद्धवजी ठाकरे आहेत असे जाहीर सभेत अशोकराव चव्हाण यांनी उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या बाबतीत प्रकट विचार व्यक्त केल्याने शिंदे गटाच्या जिव्हारी लागले.


त्यामुळे शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी लोकसभेपूर्वी अशोकराव चव्हाण भाजपमध्ये जाणार अशी पुडी सोडली. गेल्या अनेक बैठकीत व मुलाखतीत काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब यांनी वारंवार शिंदे गटावर प्रहार केला तसेच काँग्रेस सोबत एकनिष्ठ असल्याचे अनेकदा कृतीतून दाखवून दिले असे असतानाही त्यांना बदनाम करण्यासाठी उद्धवजी ठाकरे यांना अशोकराव चव्हाण यांनी देत असलेली साथ हे सिंदे गटाच्या डोळ्यात टोचतआहे त्यामुळे असे वक्तव्य शिंदे गटाच्या शिरसाट यांच्या तोंडातून निघत आहे महाविकास आघाडीच्या अतिविरारसभेत अशोकराव चव्हाण यांचे भाषण लोक मन की बात ऐकत नाहीत .. तर महाविकास आघाडीची दिल की बात ऐकतात असे ठणकावून सांगितल्याने शिंदे गट व भाजप यांच्या पोटात गोळा आल्याची प्रतिक्रिया शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे चे सहसंपर्क प्रमुख प्रकाश मारावार यांनी दिली.

