
नवीन नांदेड। हनुमान मंदिर विणकर वसाहत, दुधडेअरी धनेगाव येथे श्रीराम कथा व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याला ३० मार्च ते ५ एप्रिल दरम्यान ज्ञानेश्वर भक्त महेश महाराज शेवाळकर यांच्या समधुर वाणीतून आयोजित करण्यात आली आहे.


पंचक्रोशीतील सर्व धर्मानुरागी धर्मप्रेमी, भाविक भक्तांना कळविण्यात अत्यंत आनंद होतो की, सध्याच्या ‘अस्थिरतेच्या जगात विज्ञानाच्या युगात मनुष्य हा आपला धर्म पंथ संस्कृती यापासून कोसोदूर चाललेला आहे. धर्माशिवाय संस्कृती शिवाय माणसाला समाधान सुख शांती प्राप्त होत नाही, हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवून श्रीराम कथा व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा या कार्यक्रमाचे आयोजन ह.भ.प. वै. मामासाहेब महाराज मारतळेकर यांच्या कृपाशिर्वादाने करण्यात आले आहे.


दरवर्षी प्रमाणे याही नवव्या वर्षी दि. ३० मार्च २०२३ ते बुधवार दि. ५ एप्रिल २०२३ सायंकाळी ७.०० ते रात्री १०.०० पर्यंत श्रीराम कथा प्रवक्ता ज्ञानेशभक्त श्री महेश महाराज शेवाळकर ज्ञानेश्वरी पारायण दररोज सकाळी ७.०० ते ९.०० वा.पारायण प्रमुख ह.भ.प.गंगाधर पाटील मिरकुटे सर्व संगीत मंडळी तबला वादक देवानंद शिंदे, यवतमाळ , आर्गन वादक अनिल उमरे, किनवट गायक साहेबराव गोरलेगांवकर हे साथसंगत देणार आहेत.


कलश मिरवणूक बुधवार दि. ५ एप्रिल २०२३ वेळ सायं. ४.०० वाजता हनुमान जन्मोत्सव चैत्र पौर्णिमा शके १९४५, गुरुवार दि. ६ एप्रिल २०२३ रोजी सुर्योदयी समयी महाप्रसाद भंडारा हनुमान जन्मोत्सवानंतर लगेचच सुरूवात होणार आहे.या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन हनुमान मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष संग्राम निलपत्रेवार, रामदास इंदूरकर,गणेश गोणे,बजरंग नागलवार, प्रभाकर पाटील शिंदे, ज्ञानेश्वर गरूडकर,प्रल्हाद गुडेवार,प्रवीण रखेवार, माधव गुडेवार यांनी केले आहे.कार्यक्रम यशस्वीतेसाठी बाबुराव बिरेवार महाराज, सुभाष पाटील गराडे, गोपाळ आंचेवर,शंकर येमेलवाड,बालाजी चौडेकर,प्रभाकर मेहरकर बालाजी गरूडकर,लक्ष्मण पाटील शिंदे,विलास बोडवार, नामदेव लोलेवार,संदीप गुरू कुलकर्णी, रामकीशन संगमवार, यांच्यासह असंख्य कार्यकर्ते,गावकरी मंडळी परिश्रम घेत आहेत.
