
नांदेड। प्रदीपभाऊ वाघमारे यांची महाराष्ट्र राज्य कार्यरत ग्रामपंचायत कर्मचारी 56-92 संघटनेच्या जिल्हा अध्यक्ष पदी निवड शासन दरबारी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी संघटनेला मजबूत बनवण्यासाठी दिनांक 2 एप्रिल रोजी नांदेड येथील शासकीय विश्रामगृहात महाराष्ट्र राज्य कार्यरत ग्रामपंचायत कर्मचारी 56 92 संघटनेचे महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. यात प्रदीप भाऊ वाघमारे यांची संघटनेच्या जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली.


यावेळी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष जावेद उस्मान शेख व गोपाळ राठोड प्रदेश उपाध्यक्ष, सरचिटणीस भारत पुंजाजी डोंगरे ,राज्य कोषाध्यक्ष विनोद देशमुख, सहसचिव शरद कांबळे, शरद डहाके संघटक, उमेश घोरपडे संतोष पांचाळ पाळेकर, संदीप चव्हाण,पप्पू दुगाडे शशिकांत पवार होटाळकर,संग्राम इंगळे विजय टापरे,मारुती चव्हाण नारायण आढाव,राजू नायवाडे, यांच्यासह अनेक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. संघटनेच्या माध्यमातून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणीसह कर्मचाऱ्यांच्या कर्मचाऱ्यांच्या असणारे प्रश्न मार्गी लावण्यासाठी मी प्रयत्न करील अशी यावेळी या निवडीवेळी प्रदीप भाऊ वाघमारे म्हणाले.

