अर्धापूर, निळकंठ मदने| बहुचर्चित नांदेड कृऊबा समीतीच्या १८ जागांसाठी तब्बल २९२ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत,अनेक मातब्बरासह हवशा,गवशा,नवशांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. दि.०५ बुधवारी अर्जाची छाननी होणार आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ जागांसाठी तब्बल २९२ जणांनी उमेदवारी दाखल केली आहे, यामध्ये माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, शामराव टेकाळे,भगवानराव आलेगावकर, संजय देशमुख लहानकर, धर्मराज देशमुख,पप्पू पाटील कोंढेकर, केशवराव इंगोले, निळकंठ मदने, बबनराव बारसे, भुजंग पाटील, दता पाटील पांगरीकर, आनंदराव कपाटे, संजय लोणे, अनिताबाई आनंदराव क्षीरसागर, ज्ञानेश्वर राजेगोरे, शिवलिंग स्वामी,अमोल डोंगरे,नवनाथ कपाटे, सौ.बंडाळे,डॉ लक्ष्मण इंगोले, बाबूराव हेद्रे, अशोक बुटले,यशवंत राजेगोरे,अशोक कपाटे साहेबराव गव्हाणे, निलेश देशमुख, सुनिल देशमुख, शिवसांब बारसे, अशोक सावंत, संजय गोवंदे, यांच्यासह शेवटच्या दिवशी २०१ उमेदवारी अर्ज तर एकुण २९२ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
यामध्ये काहिंनी हौशेपोटी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत,तर अनेक जण ग्रामपंचायत,सेवा सोसायटी किंवा इतर निवडणुकीत पराभूत होऊनही येथे उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.आघाडीची चर्चा फिसकटल्यास आपापले पॅनल रहावेत यासाठी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसने १८ जागावर उमेदवार उभे केले आहेत. या निवडणुकीत उमेदवार वाढावेत यासाठी अनेकांनी सोशल मीडियाचा आधार घेतला आहे. अनेकांचे गावातील अस्तित्व संपलेले असतांना केवळ नाव चर्चेत राहण्यासाठी अनेकजण उमेदवार बनले आहेत,तर उमेदवारी परत घेतांना काही मिळते काय या आशेने अनेकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. अर्धापूर, नांदेड व मुदखेड या तिन तालुक्यातील मतदार या निवडणुकीत भविष्य ठरवणार आहेत.
निष्ठावंत कार्यकर्त्यांनी ही उमेदवारी अर्ज दाखल केले असल्याने निष्ठावंतांना न्याय मिळणार काय ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बुधवारी दाखल केलेल्या अर्जाची छाननी होणार आहे. अनेक गावांतून दोन,तिन जणांनी काॅग्रेसकडे तिकीटासाठी मागणी केली आहे. त्यामुळे एकास उमेदवारी दिल्यास इतर नाराज होणार आहेत,याकडे पक्षश्रेष्ठींनी लक्ष दिले आहे. भारत जोडो यात्रेत यशस्वी काम करणारांना उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा आहे. अनेक वर्षांपासून एकनिष्ठ राहुन पक्षाची निस्वार्थपणे काम करणारांना काॅग्रेसची उमेदवारी मिळणार असल्याची दाट शक्यता आहे. अनेकांना गावातील सुचक व अनुमोदक मिळाला नाही याची सर्वत्र जोरात चर्चा सुरू आहे.
अनेक वर्षांपासून उमेदवारी च्या प्रतिक्षेत असलेल्या ईच्छुक उमेदवारांना उमेदवारी द्यावी अशी मागणी होत आहे,तर काही जण नवखे असून उमेदवारी मलाच द्या असा हट्ट करत आहेत. महाविकास आघाडीत उमेदवारी आपला नंबर लागेल या आशेपोटी अनेकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. या निवडणुकीत महाविकास आघाडी होणार कि नाही याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. उमेदवारी परत घेण्याची २० एप्रिल शेवटची तारीख आहे. त्यामुळे एप्रिल च्या शेवटच्या आठवड्यात या निवडणूकीचा प्रचार रंगणार आहे,या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. निवडणूक निर्णय अधिकारी अनिल चव्हाण हे काम पाहत आहेत.