Monday, May 29, 2023
Home खास न्यूज कैलास नगर जागृत हनुमान मंदिरात अभिजीत आपस्तंब व सौ. सारिका पांडे यांच्या गीतरामायण कार्यक्रम -NNL

कैलास नगर जागृत हनुमान मंदिरात अभिजीत आपस्तंब व सौ. सारिका पांडे यांच्या गीतरामायण कार्यक्रम -NNL

by nandednewslive
0 comment

नांदेड| दि. 5 एप्रिल रोजी हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्ताने सायंकाळी 7 वाजता जागृत हनुमान मंदिर, कैलास नगर, नांदेड येथे प्रसिद्ध गायक प्रा. अभिजीत रत्नाकर आपस्तंब आणि प्रसिद्ध गायिका सौ. सारिका आपस्तंब – पांडे यांच्या ‘गीतरामायण’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. स्व. ग.दि. माडगूळकर आणि स्व. सुधीर फडके (बाबूजी) यांनी अजरामर केलेली कलाकृती म्हणजे ‘गीतरामायण’ आजही रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवीत आहे.

या कार्यक्रमाचे निवेदन सुप्रसिद्ध निवेदक श्री सुधीर पूरकर हे करणार आहेत. तबला साथ चेतन पांडे, संवादिनी साथ लक्ष्मीकांत धानोरकर व साईड रिदम वर सचिन शेटे हे साथ करणार असून कोरसवर सौ. जयश्री आजेगावकर – शेटे व कु. उन्मनी बोरीकर हे साथसंगत करणार आहेत. जागृत हनुमान मंदिर, कैलास नगर येथे दरवर्षी हनुमान जन्मोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात येते. सर्व नांदेडकर रसिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन जागृत हनुमान मंदिर, हनुमान जन्मोत्सव समिती यांच्या वतीने करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या वाचा

Leave a Comment

nandednewslive.com या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेत स्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Visitor counter NNL

Copyright @ 2011-2023 Online Social News Live Channel All Right Reserved -Developed & Designed by M&D Infotech Latur, Call – 86687 76434 

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
error: Content is protected !!