
श्रीक्षेञ माहूर,राज ठाकूर| मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने दिवाळी प्रमाणेच गुढीपाडवा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त १०० रुपयात आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय घेतला.त्यानुसार सोमवार दि.3 एप्रिल रोजी माहूर शहरातील अशोक बेलसरे व साधना जोशी यांच्या सरकार मान्य राशन दुकानातून सदर संचाच्या वाटपास सुरुवात झाली.


माहूरचे योगी श्यामबापू भारती महाराज, भाजपचे जिल्हाचिटणीस अनिल वाघमारे, महिला मोर्चाच्या शहराध्यक्षा अर्चना दराडे यांचे हस्ते आनंदाचा शिधा या संचाचे वाटप करण्यात आले. यावेळी पुरवठा विभागाचे अव्वल कारकून जुन्कटवार, नागोराव सुर्वे, उत्तमराव राठोड, सतीश देवपूलवार, इर्शाद फारुखी, राशन दुकानदार, लाभार्थी व पत्रकार उपस्थित होते.


माहूर तालुक्यातील २४ हजार ६३ लाभार्थ्यांसाठी २४ हजार ६३ किलो साखर,७ हजार १०० किलो चनादाळ,५ हजार किलो रवा व पामतेल देण्याचे उद्दिष्ट आहे.अशी माहिती पुरवठा विभागातील अव्वल कारकून एस.पी.जुकंटवार यांनी दिली.

