
हदगाव, शे.चांदपाशा| एखादी नवीन गृहनिर्माण कॉलनी अथवा भुखंड विक्री करण्यासाठी ताणतरिक मानायला घेतली असली तरी सर्व सोई सुविधा देण्याच्या नावाखाली नको त्या याठिकाणी प्लॉटिंग विक्रीचा गोरखधंदा हदगाव मध्ये सध्या जोरात सुरु आहे. स्वतःच्या फायद्यासाठी भूमाफियांकडून गरजूना फसवून विक्री केली जात असल्याने अनेकांना पुन्हा पश्चाताप होतो आहे.


हदगाव शहरात व परिसरात भुखंड विक्रीचा गोरखधंदा चालविण्यासाठी ‘संबधीतांना हताशी धरुन आकर्षक जाहीरातीचा नवीन फंडा वापरुन कोणत्याही कानाकोप-यात ओढे नदीच्या नैसर्गिक पाण्याचा प्रवाहाची परवा न करता त्याच्या काठावर शेत जमीनी घेतल्या जात आहेत. तहसिलदार किवा उपविभागीय आधिका-या कडून तांञिक मंजुरी घेवून काळ्या कसदार शेत जमीनीचे तुकडे पाडुन आकृषिक परवानगी घेवून नगररचना विभागाच्या तांत्रिक मंजुरी नंतर प्लाँट कोणत्याही प्रकारच्या मुलभूत सुविधा न देता विक्री होत आहेत.


स्वतःचे घर असावे….
गावात किवा शहरात स्वतः घर असावे असे प्रत्यकाचे स्वप्न असते. पोटाला पीळ देवून पैसे जमा करुन प्लाँट घेतात. सध्या हदगाव शहरात व परिसरात काही ठिकाणी बे-कायदा प्लाँटची विक्री बे-फाम सुरु आहे. यामध्ये गरजू प्लाँट धारकांची फसवणूक होण्याची दाट शक्यता दिसुन येत आहे. कधी ही रद्द होणारे (सौदा-चिट्टी) च्या बळावर खरेदी विक्री जोमात सुरु असुन, या मध्ये सौदा चिट्टी द्वरे लाखोच नव्हे तर करोडो रुपायांचा अर्थिक व्यव्हार पडद्याआड केले जात आहेत. सौदाचिट्टीवर माञ नाममाञ व्यव्हार असतो यामध्ये प्रशासकीय स्तरावर अधिका-याच किती सहभाग असेल. हे आताच सागणे धाडसाचे ठरणार नाही अस या धंद्यात सामील झालेल्या काही जाणकारांनी सागितले आहे.


मुलभूत सुविधा नाहीच..
असे प्लाँटीग खरेदी केलेल्या प्लाँट धारकांनी घरे बांधत आसताना पक्के रोड या बरोबर सांडपानी कुठे सोडायचे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा कोठून विजेचे पोल आदी प्रश्न निर्माण होत आहेत. एव्हडेच नाहीतर त्यानंतर देखील घेतलेल्या प्लॉटिंगची जागा किती जणांना विकली जातेय याबाबतही सध्या साशंकता निर्माण होते आहे.

आयकर विभाग …
हदगाव शहरात व परिसरात प्लाँटचे बहुतांशी आर्थिक व्यव्हार होत असतांना माञ आयकर विभाग गाढ झोपेत आसल्याच दिसुन येत आहे. असे पडद्याआड लाखोचे नव्हे तर करोडोचे व्यव्हार होत असतांना ‘आयकर विभागाला कानोकानी माहीती नसावी. हे नपटणारे असुन, या बाबतीत या विभागाने सखोल चौकशी करावी अशी जागरुक नागरीकांकडून मागणी केली जात आहे.
