
नवीन नांदेड। माजी पंचायत समिती सदस्य सुनिल पवार यांनी नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सेवा सहकार सोसायटी सर्वसाधारण शेतकरी प्रवगातुन ३ एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.


माजी पंचायत समिती सदस्य हे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण व नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार मोहनराव हंबडे यांच्ये विश्वासू असुन त्यांनी नांदेड कृषी उत्पन्न बाजार समिती चा सेवा सहकारी सोसायटी
सर्वसाधारण मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.


यावेळी आमदार प्रतिनिधी प्रा. बळवंत धारोजी हंबडे,माजी जिल्हा परिषद सदस्य गंगा प्रसाद काकडे,ओबीसी सेलचे नांदेड काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष गणेश काकडे, तुप्पा ग्रामपंचायत संरपच प्रतिनिधी ज्ञानेश्वर यान्नावर, चेअरमन गोविंदराव चितळे, चिमणाजी पाटील कदम, माजी सरपंच शेख चाद पाशा, सुधाकर नरवाडे, सुरज पंडित, गजानन कदम, अतुल बनसोडे, भिमराव कदम ,लोभाजी गवारे,यांच्या सह मतदार व समर्थक मोठया संख्येने उपस्थित होते.

