
नवीन नांदेड। सिडको हडको परिसरात भगवान महावीर जयंती निमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली तर मंदिरात जयंती निमित्य विविध कार्यक्रमासह महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.


दरवर्षी प्रमाणे याही वर्षी 4 एप्रिल रोजी भगवान महावीर जयंती निमित्य भव्य मिरवणूक काढण्यात आली, जैन मंदिर ज्ञानेश्वर नगर हडको येथुन भव्य मिरवणूक काढण्यात आली ती मुख्य मार्गाने हडको बसस्थानक ते एन डी ४१ मार्ग संभाजी चौक ते ढवळे काॅर्नर येथुन महावीर चौक शिवाजी चौक सिडको मार्ग जैन मंदिर ज्ञानेश्वर नगर येथे या मिरवणुकीचा समारोप करण्यात आला यात भगवान महावीर यांच्या जयघोष करीत अहीन्सा वादी चे ध्वज फलक लावण्यात आले होते. प्रारंभी सकाळी मंदिरात भगवान महावीर जयंती निमित्त भगवान महावीर यांच्या मूर्तीचा अभिषेक करण्यात आला समाजाच्या वतीने महाप्रसादचे आयोजन करण्यात आले होते.


कार्यक्रम यशश्वीतेसाठी अध्यक्ष प्रकाश सांगुळे, बबनराव तरटे , महेन्द्र तरटे, विरू तरटे, समीर संगवे,संजय तरटे, आलोने, भोपळकर, सोनटक्के, कचरू तरटे, दीलीप तरटे, मुकिरवार , विलास अंभोरे, चंदा तरटे, आल्का तरटे, कन्कमाला तरटे, माधुरी तरटे,रूपाली तरटे,लाजिरवाणी भाजिभाकरे , रमेश पोटदुखे, माधुरी भाजिभाकरे, यांच्या सह सिडको हडको भागातील जैन समाज बांधव व सर्व प्रतिष्ठित नागरिक महीला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

