
उस्माननगर, माणिक भिसे| येथून जवळच असलेल्या मौजे जोशीसांगवी ता.लोहा येथील सेवा सहकारी सोसायटीचे दोन एप्रिल २०२३ रोजी निवडणूक झालेल्या अतितटीच्या निवडणुकीत नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय व कर्तव्यदक्ष खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या पुरस्कृत श्री दत्तकृपा शेतकरी विकास पॅनलच्या ताब्यात सोसायटी आली असून, विद्यमान भाजपा कंधार तालुका उपाध्यक्ष तथा तेलंगवाडीचे माजी सरपंच सुरेश मामा बास्टे यांच्या गटाला तेरा पैकी तेरा जागेवर यश मिळाले आहे.


लोहा तालुक्याचे लक्ष वेधून घेणारी जोशी सांगवी सेवा सहकारी सोसायटीची निवडणूक अतिशय अतितटीच्या चुरशीमध्ये झाली यामध्ये ४० वर्षापासून सोसायटीवर वर्चस्व असलेले दिगंबर पाटील मोरे यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती यांच्या एकता शेतकरी विकास पॅनल चा दारुण पराभव झाला दिनांक २ एप्रिल २०२३ रोजी जोशीसांगवी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मतदान केंद्रावर सकाळपासूनच मतदान करण्यासाठी गर्दी जमण्यास सुरुवात झाली या निवडणुकीमध्ये जोशी सांगवी ,तेलंगवाडी, शिराढोण तांडा या गावचे मतदार होते.


या निवडणुकीत खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर पुरस्कृत श्री दत्तकृपा शेतकरी विकास पॅनल एक गट दुसरा गट एकता शेतकरी विकास पॅनल आमदार श्यामसुंदर शिंदे पुरस्कृत हे दोन गट निवडणुकीमध्ये पूर्ण तयारीशी मैदानात उतरले होते मागील सोसायटीच्या निवडणुका अत्यंत खेळीमेच्या वातावरणात पार पडल्या पण यावेळेस विरोधी गटाने एकास एक उमेदवार देऊन निवडणुकीत रंग भरला या अटीतटीच्या वातावरणात झालेल्या निवडणुकीत श्री दत्तकृपा शेतकरी विकास पॅनलला तेरा पैकी १३ पैकी 13 जागा मिळाल्या तर विरोधकांना एकही जागा ताब्यात घेतली नाही मतदान पार पडल्यानंतर निकाल उशिरा जाहीर झाला. त्यानंतर खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या समर्थकांनी फटाक्याची आकाशबाजी व ढोल ताशाच्या गजरात जल्लोष साजरा केला.


यामध्ये निवडून आलेल्या उमेदवारापेकी सर्वसाधारण उमेदवार जगदाळे हनुमंत धर्माजी – १०७ मते,पोकले मारोती गंगाराम – 102 मते ,मोरे नवनाथ भाऊराव – १०८ मते, मोरे नागोराव व्यंकटराव- १०७ मते, मोरे नामदेव बालाजी – ११४ मते , मोरे संजय भिमराव – ११६ मते , राठोड शिवाजी आमरू – १११ मते,शिंदे शिवाजी खंडू – ११६ मते,चव्हाण अंकुश त्रिभुवन – ११५ ( भ.वि.जा./ ज.वि.मा.प्र ) , तांबोळी रामदास सयाजी ( अनुसूचित जाती / जमाती – १२० मते ,ईबितवार अमृता वामण ( इतर मागासवर्गीय ) – ११५मते , गजभारे कमल देविदास ( महिला राखीव ) – ११२ मते, सुकरे अनुसया रामचंद्र ( महिला राखीव ) – १०७ मते ह्या निवडून आलेल्या उमेदवारा पैकी चेअरमन व व्हाईस चेअरमन पदी कोणाची निवड होईल ही उत्सुक्ता मतदारांना लागली आहे .

या उमेदवाराचे व पॅनल प्रमुख यांचे जोशी सांगवी येथील गावातील प्रमुख रस्त्याने फटाके वाजवून ढोलताशाच्या गजरात विजय मिरवणूक काढण्यात आली .यावेळी लोहा भाजपा तालुका अध्यक्ष तथा माजी सभापती आनंदराव पाटील शिंदे,शंकरराव ढगे माजी सभापती,नरेंद्र गायकवाड – माजी उपसभपती,साहेबराव काळे धावरी येथील सरपंच, भद्रीनाथ राजूरे दापशेड येथील सरपंच, मोरे टेळकी येथील सरपंच, काळे वडगाव येथील सरपंच, लामदेवडे टाकळगा येथील सरपंच, व मतदार व गावकरी मंडळी विजय मिरवणूकीमध्ये मोठ्या संख्येने उपस्थित होते. जोशीसांगवी,तेलंगवाडी,शिराढोण तांडा,येथील मतदारांनी अमूल्य मत देवून विजयी केले व १३ पैकी १३ उमेदवार निवडून दिल्याबद्दल पॅनल प्रमुख सुरेश मामा बास्टे व संजय पाटील मोरे यांनी सर्व मतदारांचे आभार मानले.

नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे विश्वासू कार्यकर्ते तथा जोशीसांगवी ता.लोहा येथील माजी सरपंच , गोरगरिबांच्या मदतीला धावून पुढं येऊन सहकार्य करणारे संजय पाटील मोरे हे सेवा सहकारी सोसायटी निवडणुकीत प्रचंड मताने निवडून आले आहेत. चेअरमन पदाचे दावेदार असल्याचे सांगितले जात आहे.