
लोहा| शहरात वर्धमान भगवान महावीर यांच्या जयंती निमित्त जैन मंदिरा पासून भगवान महावीर यांच्या तैल चित्रासह मिरवणूक शहराच्या मुख्य रस्त्याने निघाली. विविध राजकीय सामाजिक संघटनांनी पुष्पहार अर्पण करून वंदन केले.


नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी, माजी नगराध्यक्ष किरण वटटमवार, माजी उपनगराध्यक्ष केशवराव मुकदम, उपनगराध्यक्ष दता वाले, आर्य वैश्य समाजाचे अध्यक्ष दिनेश तेललवार, व्हाईस चेअरमन हरिभाऊ चव्हाण, यासह विविध राजकीय सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी वर्धमान महावीर यांच्या प्रतिमेस वंदन केले.प्रसिद्ध हृदय रोग तज्ञ डॉ.राहुल घंटे यांनी भगवान महावीर याच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून वंदन केले.


लोहा शहरात दरवर्षी प्रमाणे यंदा निघालेल्या मिरवणुकीत हिरालाल घंटे, जिवन घंटे, व्यकंटराव घंटे, अनंत जैन, राजेश घंटे, नागेश संगवे, अनंत स़ंगवे, अमोल घंटे, महावीर राजमाने, अतवीर राजमाने, अजित काळेगोरे, मनोज बुजूर्गे, बबलू देशमाने महावीर देशमाने, त्रिबक देशमाने ,विशाल घंटे, विक्रम घंटे, यासह महिला व समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

