
लोहा| तालुक्यातील उमरा-गोविंद तांडा येथील तरुण शेतकरी नागोराव तेजेराव चव्हाण (वय ३५ वर्ष ) यांनी गळफास लावून आत्महत्या केल्याची ही घटना चार दिवसा पूर्वी घडली. नाम फाऊंडेशन नांदेडचे संपर्कप्रमुख भाऊराव मोरे व सल्लागार सा.रा. जाधव यांनी लोहा तालुक्यातील उमरा येथील गोविंद तांडा येथे जाऊन आत्महत्याग्रस्त कुटुंबियांची भेट घेतली त्यांचे सांत्वन केले. आणि लेकरांच्या शिक्षणाची सोय करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासित केले.


आत्महत्याग्रस्त शेतकरी नागोराव तेजेराव चव्हाण याना दोन मुले आहेत. पांडूरंग हा इयत्ता ९ वी मध्ये तर भाष्यकार नागोराव चव्हाण हा इयत्ता सातवी वर्गात आहे. नामच्या वतीने जिल्हा संपर्क प्रमुख भाऊराव मोरे व सल्लागार एस आर जाधव यांनी त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. लेकरांच्या शिक्षणाची व्यवस्था या शैक्षणिक वर्षापासून रयत शिक्षण संस्था सातारा येथे करण्यासाठी व मोफत जेवण, निवास व गणवेशाची पदवीत्तर शिक्षणासाठी शिफारस श्री मोरे यांनी केली.


रयत शिक्षण संस्थेने ती जबाबदारी भाऊराव मोरे यांनी केलेल्या शिफारशीनुसार स्विकारली. याप्रसंगी मारोती राठोड, वारसदार पत्नी श्रीमती चांगुणाबाई नागोराव चव्हाण, पवन शिरसाट, सचिन सिरसाठ (ग्रा.पं. सदस्य उमरा), पंडित राठोड.उपस्थित होते. तहसीलदार मुंडे यांनी या शेतकऱ्यांना शासकीय मदत देण्याचे आश्वासित केले.

