
हदगाव, शे.चांदपाशा| जबरी चोरी अपहरण राँबरी व इतर अनेक गंभीर गुन्ह्यात शामील असलेल्या एका अट्टल गुन्हेगाराला नादेड गुन्हा अन्वेशन विभागाचे पथक व हदगाव पोलिस स्टेशनचे पोलिस निरक्षक जगनाथ पवार यांनी सयुक्तरित्या विदर्भातील उमरखेड पोलिसाच्या सहकार्याने सोमवारी सांयकाळी विदर्भातील उमरखेड -पुसद रोड कँनाल जवळ फिल्मी स्टाईलने अटक केली आहे. सदर आरोपी हा कुण्या तरी गंभीर गुन्हे करणा-या टोळीचा सदस्य असल्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत असुन, सदर आरोपीला तो वापरत असलेली कार गुन्हा अन्वेशन विभागाने ताब्यात घेतली. आणि आरोपीला नादेडला घेवुन गेल्याची माहीती आहे.


या बाबतीत समजलेली माहीती अशी की, अट्टल गुन्हेगार याने नादेड जिल्ह्यातील मुखेड शहरातुन एका महीलेचे अपहरण केले. या अट्टल गुन्हेगाराच लोकेशन विदर्भाती ‘पोहरादेवी’ येथे दाखविल्या नंतर नादेडचे गुन्हा अन्वेशन विभागाचे कर्तव्यदक्ष वरिष्ठ पोलिस निरक्षक यांनी व्युहरचना करुन त्यांनी हदगाव पोलिस स्टेशनला संपर्क साधला. हदगाव पोलिसांनी तिथे जाऊन त्यास पकडण्याचा प्रयत्न केला असता तो अट्टल गुन्हेगार पोलिसाची चाहुल लागताच तेथून कार घेवुन पसार झाला.


त्याचा पाठलाग करित असतांना तो भरधाव वेगाने वाहन चालवत होता. रोडवर येणा-या अनेक वाहनाचे त्याने नुकसान केले परंतु सुदैवाने कोणती ही जीवीतहानी झाली नाही. या बाबतीत विदर्भातील उमरखेड पोलिस स्टेशनला सुचना दिली असता तेथील पोलिसनी लगेच नाका- बंदी करुन सदर अट्टल गुन्हेगाराला पुसद उमरखेड रोडच्या कँनाल जवळ जेरबंद केले. आणि त्यास नादेडचे गुन्हा अन्वेशन विभागाचे पोलिस व हदगावच्या पोलिसांच्या स्वाधीन केले.


त्या कारला ‘पोलिस’ नेम प्लेट
जो आरोपी जेरबंद करण्यात आलेल आहे त्या आरोपी कडुन पोलिसाची नेम प्लेट व व्हिआयपी क्रमांक असलेली कार आढळून आलेली आहे. सदर कार चोरीची आहे की, आरोपीची याचा उलगडा अणखीन व्हायच आहे. आजकाल काही खाजगी वाहनावर पोलिस, प्रेस, महाराष्ट्र शासन असे नाव वाहनावर टाकण्यात येत आहे. असेच वाहन हा अट्टल गुन्हेगार वापरत होता आता तर प्रेस नाव टाकुन तालुक्यात अवैध दारु तस्करी ग्रामीण भागात करण्यात येत आहे. या संबधी या पुर्वी नांदेड न्यूज लाईव्हने बातम्या प्रकाशित करण्यात केल्या होत्या. त्यांची दखल तात्कालिक नादेड परिक्षेञाचे पोलिस उपमहानिरक्षक यांनी घेतली होती. तेंव्हा नादेंड जिल्ह्यातील सर्व पोलिस स्टेशनला या संबधी माहीती घेवुन अश्या वाहनावर कारवाई करण्याचे करण्याचे पञाद्वरे आदेश दिले होते. तरीदेखील अनेक ठिकाणी कोणताही संबंध नसताना अश्या प्रकारचे नाव लिहून वापरण्यात येत आहेत. याकडे पोलीस अधीक्षक साहेबानी लक्ष देऊन यावर नियंत्रण आणणे गरजेचे आहे.
