
उस्माननगर| इस्लाम धर्मामध्ये रोजा (उपवास) करणे यासाठी अनन्य साधारण महत्व आहे.९ वर्षांचे बालक पठाण अदनान अब्राल यांनी आपला पहिला (उपवास) रोजा करून प्रार्थना केली.नऊ वर्षांच्या बालकाने केलेल्या या रोजासाठी कुटूंबियांनी त्याचे कौतुक केले आहे.


उस्माननगर येथील रहिवासी व टेलर असलेल्या अब्राल पठाण आणि त्यांची पत्नी ,आजा ( दादा ) मुजमिलखा पठाण ,चुलता ( चाचा ) फिरदोस पठाण व मामा यांच्या घरातील नऊ वर्षाचा अदनान पठाण इस्लाम धर्मातील शिकवणीनुसार आपला पहिला रोजा यशस्वीपणे पुर्ण केला. पठाण अदनान यांचे आजोबा मुजमिलखा पठाण ,आजी , चुलता फिरदोस पठाण ,चुलती , तसेच आई – वडील अब्राल पठाण यांनी आपल्या बालकाला भविष्यातील जीवनासाठी शुभकामना दिल्या आहेत.

