
नांदेड| भारत सरकारचा वैज्ञानीक आणि तांत्रिक शब्दावली आयोग, शिक्षण मंत्रालय, उच्च शिक्षण विभाग हा विविध शैक्षणिक योजने बरोबरच वेळोवेळी विज्ञान विषयावर परिषदा तसेच शब्दावली निर्माण करण्याच्या दृष्टीने तज्ञ व्यक्तिंच्या बैठकीचे आयोजन करत असते.


अशा बैठकींचा उद्देश विषय तज्ञ तथा भाषा तज्ञ यांच्या सल्याद्वारे शब्दावली (इंग्रजी-हिंदी-मराठी) तयार करते. यावर्षी या महत्वपुर्ण कार्यासाठी नांदेड येथील व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील निवृत्त माहिती शास्त्रज्ञ रणजित धर्मापुरीकर यांची तज्ञ म्हणून निवड झाली आहे.


यापूर्वीही सार्क देशातील निवडक ग्रंथपाल प्रशिक्षणासाठी भारतीय प्रतिनिधी म्हणून त्यांची निवड झाली होती. शब्दकोश निर्मिती कार्यात सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

