
नांदेड। आझाद ग्रूप व दैनिक यूवाराज्य यांच्या संयूक्त विद्यमाने दरवर्षी विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींना गौरविण्यात येते. यावर्षी हे पूरस्काराचे पहिले वर्षे असून, यावर्षीचा आझाद ग्रूप व दैनिक यूवाराज्यचा यूवा आयकॉन २०२३ चा पूरस्कार हॉटेल गणराज पॅलेस नमस्कार चौक नांदेड येथे दि.२/४/२०२३ रोजी हा पूरस्कार सामाजीक कार्यकर्ते भूषण जोशी यांना सर्व मान्यवरांच्या शूभहास्ते देवून त्यांना गौरविण्यात आले.


कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी शेतकरी कामगार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षा सौ आशाताई श्यामसूंदर शिंदे उदघाटक सौ सविता संतोष मूरकूटे प्रमूख पाहूणे म्हणून सेवाभावी संस्था सेलू च्या उपध्याक्षा सौ.सुमनबाई आनंतराव शिंदे माजी छत्रपती शंभूराजे इंग्लीश स्कूल कंधार च्या अध्यक्षा सौ.प्रा डॉ.मनिषा पुरुषोत्तम धोंडगे व सल्लागार समिती मह्णून यूवाराज्य वृत्तपत्राचे मूख्य संपादक अजित पाटील साहित्यीक धाराशीव शिराळे सहशिक्षक विनोद गवते जिल्हाध्यक्ष प्रभाकर पांडे कार्यकारिणी सदस्य प्रा.दिपक रायफळे, विनीत आझाद ग्रूप महाराष्ट्रचे संस्था आदि उपस्थित होते.

