
नायगाव, रामप्रसाद चन्नावार| नायगाव तालुक्यातील बरबडा येथे दि.६ एप्रिल २०२३ रोजी संगीतमय हनुमान जन्मोत्सव सोहळ्याची जय्यत तयारी सुरू असून, पंचक्रोशीतील हनुमान भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सर्व गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे.


गुरुवार दिनांक ६ एप्रिल रोजी पहाटे ठीक पाच वाजता अजय शेवाळे बरबडेकर निर्मित स्वरगंध संगीत संच नांदेड तर्फे आयोजित संगीतमय हनुमान जन्मोत्सव सोहळा – 2023 या सांगीतिक कार्यक्रमाला सुरुवात होणार असून,यावेळी मराठी हिंदी-भक्ती गीतांचा तसेच वीर हनुमानजी वर आधारित भजन संध्येचा बहारदार कार्यक्रम संपन्न होणार आहे.सूर्योदयावेळी हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात येणार असून जन्मोत्सवानंतरही संगीत सेवा सुरू राहणार आहे.साडे सात ते आठ दरम्यान श्री हनुमंतरायांच्या आरतीनंतर कार्यक्रमाची सांगता होणार आहे.यावेळी 501 हनुमान चालीसाच देखील वाटप होणार असून,सामूहिक पठण करण्यात येणार आहे.


नांदेड येथील प्रसिद्ध गायक डॉ.शिवराज शिंदे,शिव मठपती,जयपाल मठपती, कु.शीतल जामगे यांच्यासह प्रसिद्ध तबला वादक स्वप्नील धुळे, ऑक्टोपॅड आदित्य डावरे, ढोलक समाधान राऊत साईड रिदम अंकुश डाकोरे तर संगीत संयोजन आणि कीबोर्ड वादक अजय शेवाळे बरबडेकर यांची संगितसाथ मिळणार असून,गावातील व पंचक्रोशीतील सर्व हनुमान भक्तांनी तसेच महिलांनी देखील मोठ्या संख्येत उपस्थित राहून या संगीतमय हनुमान जन्मोत्सवाचा लाभ घेण्याचा अवाहन बरबडा येथील ग्रामस्थांकडून करण्यात आले आहे.

