अर्धापूर| ३० मार्च रोजी रामनवमीचे मिरवणूक पाहण्यासाठी गेलेला वेदांत शरद बुटे वय 14 वर्षे हा त्याच्या आत्याकडे गजानन नगर सोसायटी नमस्कार चौक येथे शिक्षणासाठी राहत होता. 30 मार्च रोजी रामनवमीची मिरवणूक पाहून येतो म्हणून तो दुपारी दोन वाजता घराच्या बाहेर पडला तो आज पर्यंत सापडला नाही.
मालेगाव येथील रहिवासी शरद दत्तात्रय बुट्टे यांचा मुलगा शिक्षणासाठी त्यांच्या आत्याकडे लहानपणा पासूनच राहत होता. रामनवमीची मिरवणूक पाहून येतो म्हणून गेलेला मुलगा अजून पर्यंत आला नाही. त्यामुळे त्याची चौकशी वडिलांनी सर्व नातेवाईक मित्र व क्लासेस वाले यांच्याकडे केली. तरी तो अद्याप पर्यंत कुठेही सापडला नाही. म्हणून त्याचे वडील शरद दत्तात्रय बुट्टे यांनी अज्ञात इसमाविरुद्ध विमानतळ पोलिस स्थानकात मुलाला पळवून नेल्याचा गुन्हा दाखल केला आहे.