
श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर। माहूर शहरातील देवदेवेश्वर मंदिर परिसर चक्रधर नगर मध्ये राहणाऱ्या एका युवकाने जमदग्नी खोरी कडे जाणाऱ्या रस्त्यावरील पार्किंगच्या मागे असलेल्या दरीतील पळसाच्या झाडाला नायलॉन दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दि ,४ एफ्रील रोजी सायंकाळी ४.३० वाजताच्या दरम्यान उघडकिस आली.


चक्रधर नगर येथील रहिवासी आशिष प्रेमदास आराध्ये वय ३५ वर्ष हा मोल मजुरी करणारा हसमुख युवक होता याने मंगलवार दि,४ रोजी साय,४.१५ वा, आपल्या व्हाट्सअप स्टेटस वर “माझ्या सर्व शुभ चिंतकांना आज शेवटचा देवदत्त जीवन खूप कमी आहे माझ्याकडून कुणाला त्रास झाला तर माफ करा मी माझ्या मित्रासोबत दिवस दिला यानंतर कोणाला त्रास नाही होणार” हृयामुळे मित्रांनी व नातेवाईकांनी शोधा शोध केली असता मातृतीर्थ रोडकडे आशिष आराध्ये हा रस्त्याने जाताना दिसल्याचे काही लोकांने पाहीले असल्याची मिहीती मिळाली.


शंका आल्याने त्यांनी जाऊन बघितले असता आशिष हा झाडाला लटकलेल्या मृत अवस्थेत दिसल्याने त सदरील घटना पोलिसांना कळविली सपोनी श्रीधर जगताप बिट जमादार विलास आडे होमगार्ड शेख रज्जाक यांनी तात्काळ घटनास्थळ गाठून मयत आशिषचे प्रेत खाली उतरवून ग्रामीण रुग्णालयात आणले , मयत आशिष आराध्ये याचे पश्चात आई वडील विवाहीत बहिण, पत्नी एक मुलगा आणि दोन मुली आहेत कष्टकरी मनमिळावू स्वभावाचा आशिष आराध्ये यांनी आत्महत्या का केली याचे कारण समजले नसून त्याच्या आत्महत्येने माहूर शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

