
नांदेड| मागील गुन्हयातील गुन्हेगारांना अटक करण्याबाबत पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी पोलीस निरीक्षक, स्थागुशा नांदेड यांना आदेशीत केले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक, स्थागुशा , नांदेड यांनी वेगवेगळी पथके तयार करुन गुन्हयातील आरोपीचा शोध घेणे चालु केले होते. जबरी चोरी करणारा एक आरोपी 1,11,000/- रुपयाचे मुद्येमालासह ताब्यात घेऊन 05 गुन्हे उघडकीस आणली आहेत. या कार्यवाहीबद्दल सदर पथकाचे पोलीस अधीक्षक नांदेड यांनी कौतुक केले आहे.


दिनांक 04/04/2023 रोजी स्थागूशाचे पथकातील अधिकारी यांना गूप्त बातमीदाराकडून खात्रीशीर माहीती मिळाली की, असर्जन नाका ते असदवन जाणारे रोडवर ग्रामीण तंत्रनिकेतन मुलांचे हॉस्टेलचे पाठीमागे, नांदेड परीसरात पोलीस ठाणे नांदेड ग्रामीण हद्यीतील पांगरी रोडवर जबरी चोरी करणारा इसम थांबलेला आहे. यावरून त्यांनी वरीष्ठांना कळून स्थागुशाचे पथकाने ग्रामीण तंत्रनिकेतन मुलांचे हॉस्टेलचे पाठीमागे, नांदेड येथे जावुन सापळा रचुन आरोपी नामे सतिष ऊर्फ चिमण्या नायबराव हंबर्डे वय 22 वर्षे व्यवसाय बेकार रा. विष्णुपुरी नांदेड यास पकडुन विचारपुस करता त्यांनी पोलीस ठाणे नांदेड ग्रामीण 1) गुरनं. 206/2023 कलम 392 भा द वि 2) गुरनं. 208/2023 कलम 457,380 भा. दं. वि. 3) गुरनं. 225/2023 कलम 379 भा. दं. वि. 4) गुरनं. 211/2023 कलम 379 भा. दं. वि. 5) गुरनं. 203/2023 कलम 379 भा. दं. वि. हे गुन्हे केल्याचे कबुल केले आहे.


वरील आरोपीकडुन गुन्हयातील चोरी केलेला मोबाईल, 02 मोटार सायकल व तलवार असा एकुण 1,11,000/- रुपयाचा माल हस्तगत करण्यात आला आहे. सदरील आरोपीस पो. स्टे. नांदेड ग्रामीण येथे पुढील तपासकामी देण्यात आले आहे. या आरोपीकडुन आणखीन गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.


सदरची कामगिरी मा. श्री श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक, नांदेड, मा. श्री अबिनाश कुमार अपर पोलीस अधीक्षक, नांदेड, मा. श्री खंडेराव धरणे, अपर पोलीस अधीक्षक, भोकर, श्री व्दारकादास चिखलीकर, पोलीस निरीक्षक स्थागूशा नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली, सपोनि/ पांडुरंग माने, सपोउपनि/ माधव केंद्रे, पोहेकॉ/गंगाधर कदम, पो कॉ / तानाजी येळगे, मोतीराम पवार, रणधीर राजबन्सी, अर्जुन शिंदे, यांनी पार पाडली आहे. सदर पथकाचे मा. पोलीस अधीक्षक नांदेड यांनी कौतुक केले आहे.
