हिमायतनगर| आजकालच्या विज्ञानसंपन्न युगात कुस्ती सारखे पारंपारिक खेळ तरुणाईतून लुप्त होत असतांना हिरण्यगर्भ बहुउद्देशीय प्रतिष्ठाण, सिरंजणी यांच्या सौजन्याने पैलवान कै. किशन (बाबड्या) नागोबा वासुदेव यांच्या स्मरणार्थ येत्या ८ एप्रिल रोजी सिरंजणी येथे भव्य कुस्ती स्पर्धा होणार आहेत. या बरोबरच सिरंजणी येथील काही ज्येष्ठ पैलवान आणि आदर्श समाजकार्य करणार्या ज्येष्ठ व्यक्तींना हिरण्यगर्भ जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.
भव्य आयोजन असलेल्या कुस्ती स्पर्धेत पैलवानांसाठी बक्षिसांचा अद्भुत वर्षाव होणार आहे. शेवटच्या मानाच्या कुस्तीसाठी आकर्षक चांदीची गदा आणि रुपये ५००१ रोख रक्कम हे बक्षीस जाहीर झालेले आहे. व तसेच ५० आकर्षक विजयचिन्हा सोबत २०००, १०००, ५००, २०० रुपयाच्या अनेक कुस्त्या रंगणार आहेत. स्पर्धेत सहभागी होणार्या प्रत्येक पैलवानाला हिरण्यगर्भ बहुउद्देशीय प्रतिष्ठाण मार्फत एक प्रमाणपत्र सन्मान पूर्वक प्रदान करण्यात येणार आहे.
वेगवेगळे नाविन्यपूर्ण सामाजिक उपक्रम घेण्यासाठी हिरण्यगर्भ बहुउद्देशीय प्रतिष्ठाण ची प्रसिध्दी असतांनाच, ईतक्या असंख्य बक्षिसांची ही नाविन्यपूर्ण आणि अनोखी कुस्ती स्पर्धा जनतेत चर्चेचा विषय ठरला आहे. सिरंजणी पंचक्रोशीतील बलोपासना जोपासणाऱ्या तरुणाईला प्रोत्साहन आणि बलोपासनेपासून दुर असलेल्या तरुणाईला प्रेरणा देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या भव्य कुस्ती स्पर्धेत असंख्य पैलवानांनी सहभाग घ्यावा असे नम्र आवाहन हिरण्यगर्भ बहुउद्देशीय प्रतिष्ठाण चे अध्यक्ष श्री नारायण गंगाराम करेवाड यांनी केले आहे.