
नांदेड| महाराष्ट राज्य भारत स्काऊटस् आणि गाईडस्, मुंबई यांच्या परवानगीने शिक्षण विभाग, जिल्हा परिषद नांदेड तथा नांदेड भारत स्काऊटस् आणि गाईडस् जिल्हा कार्यालय नांदेड यांच्या वतीने दिनांक 27.03.2023 ते 02.04.2023 या कालावधीत नांदेड भारत स्काऊटस् आणि गाईडस् जिल्हा कार्यालय, मल्टीपर्पज जि. प. हायस्कुल च्या पाठीमागे वझीराबाद, नांदेड येथे स्काऊट मास्तर व गाईड कॅप्टन प्राथमिक प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.


त्यामध्ये नांदेड जिल्हयातील 23 शिक्षिका तसेच 29 शिक्षक यांनी सात दिवसीय प्रशिक्षणात सहभाग घेतला. सदर प्रशिक्षणाच्या उदघाटन समारंभाला मा. शिक्षणाधिकारी(प्रा) सविता बिरगे मॅडम यांनी स्काऊट व गाईडचे महत्व् विशद केले तसेच प्रत्येक शाळेतील शिक्षकांनी सदर प्रशिक्षण घेणे का महत्वाचे आहे त्या बदल माहीती दिली.


सदर प्रशिक्षणाला स्काऊट विभागाकरीता शिबिर प्रमुख म्हणून श्री. श्री. आर. आर. फुलारी,ए.एल.टी (स्का), तर त्यांना सहायक म्हणून श्री. जनार्दन ल. इरले, ए.एल.टी (स्का) तथा जिल्हा संघटक, तसेच परभणी जिल्हयातील जिल्हा संघटक श्री मिलिंद तायडे प्री.ए.एल.टी (स्का), श्री विशाल ताराचंद्र ईश्वरकर HWB(S), श्री. हेमंत बेंडे HWB(S), श्री विनोंद सोनटक्के HWB(S), यांनी काम पाहीले.


तसेच गाईड विभागाकरीता शिबिर प्रमुख म्हणून श्रीमती माधुरी जवणे, ए.एल.टी (गा), परभणी, त्यांना सहायक म्हणून श्रीमती शिवकाशी तांडे, जिल्हा संघटक (गाईड) व श्रीमती ज्याती शिंदे, प्री.ए.एल.टी (गा) म्हणून काम पाहीले. तसेच सदर प्रशिक्षण शिबिरास जिल्हा प्रशिक्षण आयुक्त् (स्का/गा), विस्तार अधिकारी शिक्षण, जिल्हा चिटणीस यांनी मार्गदर्शन केले.

सदर शिबिरात शाळेत स्काऊट/गाईड युनिट कशा प्रकारे चालवावे तसेच शिक्षकांना निसर्ग निवासाच्या सानिध्यातील शिक्षण, मागाच्या खुणा, गाठी, प्रथमोपचार, मॅपींग, पायोनियरिंग, प्रवेश, प्रथम सोपान,व्दितीय सोपान, तूतीय सोपान अभ्यासक्रम, इत्यादी अभ्यासक्रम व प्रात्यक्षिके याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. सदर शिबिर यशस्वीकरण्याकरीता जिल्हा कार्यालयातील कर्मचारी श्री. परमेश्वर बनसोडे, श्री. विशाल ईश्वरकर, श्री, अनुराधा कोटपेटे, श्री संजय गुडलावार यांनी सहकार्य केले.
