
नांदेड। मंगळवार दिनांक 03 एप्रिल 2023 रोजी पोलीस ठाणे नांदेड ग्रामीण हद्दीमध्ये घडलेल्या गोळीबार घटनेच्या अनुषंगाने श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधिक्षक, नांदेड, अविनाश कुमार, अपर पोलीस अधिक्षक, नांदेड, चंद्रसेन देशमुख उप विभागीय पोलीस अधिकारी, उप विभाग, नांदेड शहर, सिध्देश्वर भोरे, उप विभागीय पोलीस अधिकारी, उप विभाग ईतवारा यांनी नांदेड शहरातील गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व अंमलदार यांना अभिलेखावरील गुन्हेगारांना चेक करण्याच्या सुचना दिल्या होत्या.


वरिष्ठांच्या सुचनांप्रमाणे चंद्रसेन देशमुख, उप विभागीय पोलीस अधिकारी उप विभाग नांदेड, जगदीश भंडरवार, पोलीस निरीक्षक, पोलीस ठाणे वजीराबाद नांदेड यांचे मार्गदर्शनाखाली वजीराबाद पोलीस स्टेशन येथील गुन्हे शोध पथकाचे अधिकारी शिवराज जमदडे, पोहेकॉ/ दत्तराम जाधव, पोना/ मनोज परदेशी, पोना/ विजयकुमार नंदे, पोकॉ/ शेख ईम्रान शेख एजाज, पोकॉ बालाजी कदम, पोकॉ/ रमेश सुर्यवंशी, पोकॉ/ भाऊसाहेब राठोड यांनी पोलीस ठाण्याचे अभिलेखावरील शस्त्र बाळगणारे गुन्हेगारांची यादी तयार करुन त्यांना चेक करुन त्यांच्या हालाचालीची माहीती घेत असतांना एकुण 27 गुन्हेगारांना चेक केले.


दरम्याण काल दिनांक 04 एप्रिल 2023 रोजी गुप्त बातमीदारा मार्फत माहीती मिळाली की, गोवर्धनघाट स्मशानभुमीजवळ एक इसम आपले ताब्यात पिस्टल बाळगुन थांबला आहे. त्यावरुन सदर ठीकाणी नमुद पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी छापा मारुन त्या ईसमास पकडले. त्यास त्याचे नांवगांव विचारणा करता त्यांनी आपले नांव शेख महेफुज शेख सलीम, वय 19 वर्षे रा. खुशीनगर कौठा नांदेड असे सांगितले. सदर ईसमाने बिनापरवाना, बेकायदेशिररित्या गावठी पिस्टल स्वत:चे ताब्यात बाळगलेला मिळुन आल्या प्रकरणी पोना. मनोज परदेशी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन भारतीय शस्त्र अधिनियमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन, सदर गुन्हयाचा तपास सपोनि शिवराज जमदडे हे करीत आहेत. अवैद्य शस्त्र बाळगल्या प्रकरणी नमुद ईसमास अटक करुन गुन्हा दाखल केल्या प्रकरणी वरीष्ठांनी नमुद पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे कौतुक केले आहे.

