
नवीन नांदेड। हनुमान जन्मोत्सवा सोहळ्या निमित्ताने भायेगाव येथील हनुमान मंदिर येथे विविध धार्मिक कार्यक्रम व महाप्रसादाचे आयोजन ६ एप्रिल रोजी करण्यात आले आहे.


दर वर्षी प्रमाणे या ही हानुमान जयंतीनिमित्त नगर ,गाव भोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो आणि हे अकरावे वर्ष आसुन यावर्षी महाअभिषेक, आरती, भजन, कीर्तन,यासह विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे,परीसरातील सर्व गावकरी बांधव तुप्पा,किक्की,राहेगाव,काकांडी, जवाहरनगर, पिंपळगाव मीश्री, वडगाव, येथील सर्व मीत्र मंडळ व गावातील सर्व लोक महाप्रसादचा लाभ घेण्यासाठी येत असतात सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या जन्मोत्सव सोहळ्याला भाविक भक्तांनी उपस्थित राहण्याचे आवाहन संरपच प्रतिनिधी बालाजी पाटील भायेगावकर व समस्त गावकरी मंडळी यांनी केले आहे.

