
नायगाव, रामप्रसाद चन्नावार। नायगाव तहसील कार्यालयाचे प्रभारी तहसीलदार श्रीकांत निळे यांच्या आदेशानुसार दिनांक ६ एप्रिल २०२३ रोजी सकाळी ११ वाजता नायब तहसीलदार जायभाये यांच्या मार्गदर्शनाखाली अव्वल करकून दराडे मॅडम यांच्यासह गोडाऊन किप्पर शेख युनुस यांनी वाटपाचा शुभारंभ केला असल्याची माहिती दिली आहे.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्यावर्षी दीपावलीला गोरगरीब जनतेसाठी स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमातून एक महत्त्वकांक्षी योजना लागू केली ती म्हणजे आनंदाचा शिधा शंभर रुपयात चनाडाळ.एक किलो.साखर एक किलो.रवा एक किलो.गोडतेल एक किलो.असे घरगुती संसार उपयोगी वस्तू देण्यात आल्या होत्या त्यानंतर शासनाने गुढीपाडव्याला आनंदाचा शिधा वाटप करण्यात येणार असल्याची जोरदार चर्चा जनतेतुन ऐकावयास येत होती ती प्रतिक्षा आता संपुन वाटपाचा शुभारंभ पार पढला आहे.


शासनाकडून आलेला आनंदाचा शिधा वाटप करण्यासाठी नायब तहसीलदार जायभाये यांच्या मार्गदर्शनाखाली अव्वल कारकुन दराडे मॅडम,व गोडाऊन किप्पर शेख युनुस यांच्यासह मुकदम माधवराव कांबळे नामदेव शिवनकर गुरुनाथ कदम एस सोनकांबळे यांनी स्वस्त धान्य दुकानदार पिंटू गायकवाड, यांना आनंदाचा शिधा वाटप करण्यासाठी त्यांच्यापासून शुभारंभ करण्यात आला असल्याची ही माहिती शेख युनुस यांनी दिली आहे.


सर्वसामान्य माणसांनी वेगवेगळ्या समस्या व अडचणीत असताना त्यांना एक वेगळा आनंद वाटावा असा उपक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा आनंदाचा शिधा देऊन त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविला आहे एवढे विशेष वाटते.