
हदगांव, शे.चांदपाशा| केवळ निवडणूक काळात विविध राजकीय सभांना उतु येणारा व पोकळ अश्वसनाने तृप्त झालेला अशी हदगाव तालुक्याची ओळख बनलेली आहे. हदगाव तालुक्यात विविध समस्या ऐरणीवर आलेल्या असुन, मुलभूत सुविधा अभावी हदगाव शहरासह तालुक्यातील जनतेची ससेहोलपट होत आहे. शासनाकडून कोट्यावधीचा निधी येतो तो कुठे खर्च करण्यात येतो. या बाबतीत माञ सर्वसामान्य जनतेला काहीच माहीती होत नाही.


नादेड जिल्ह्यातील हदगाव तालुका सर्वात जुना व निजामकालीन आहे. सदर तालुका टोकावर असल्याने विकासाची गंगोञी पोहचलेली नाही. येथील जनता तालुक्याच्य नेतृत्वाचे फार लाड व खुप सम्मान देतात माञ जे ह्या तालुक्याचे जो नेतृत्व करतात. निवडून आल्यावर ते माञ तालुक्याच्या विकासाकडे साफ दुर्लक्ष करित असल्याचे स्पष्ट जाणवत आहे. कारण प्रशासकीय यंञणाचे फार दुर्लक्ष असते तालुक्यात बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्या तुलनेत शासकीय नौकरीचे प्रमाण अगदी नगण्य आहे.


हदगाव शहरात व तालुक्यात उच्च किवा वैधकीय शिक्षणाची सुविधा नाही. त्यामुळे अन्य ठिकाणी जावे लागते ज्या विद्यार्थीची अर्थिक परिस्थिती चांगली आहे. तो मोठ्या शहरात जाऊन शिक्षण पुर्ण करित आहेत. माञ गरिब व सर्वसामान्य परिवारातिल अर्थिक परिस्थितीमुळे मुले उच्च शिक्षणापासुन वंचित आहेत. सरकारच्य वतीने हदगाव तालुक्यात अध्याप एक ही उद्योग सुरु करण्यात आलेले नाही. अर्थिक कुवत नसल्याने स्वबळावर उद्योग सुरु करता येत नाही. बँकाकडुन सुशिक्षित बेरोजगारांना कर्ज पुरवठ्याच्या बाबतीत हाथ आखडता असतो. परिणाम स्वरुप काही युवक बे-रोजगारीला कंटाळून परराज्यात स्थालतर करित आहे ही वस्तुस्थिती आहे.


आमदाराचे प्रशासनवर वचक हवे…
नादेड जिल्ह्यात सर्वात जुना तालुका म्हणून ओळख असलेल्या हदगाव तालुक्याच्या विकासाठी तसेच मुलभुत सोयीसुविधा पुरविण्या करिता विद्यमान आमदारांनी प्रशासनाच्या अधिका-याची वर्षातीतुन तालुक्याच्या जनतेसमोर थेट भेट घेऊन ‘जनता दरबार ‘तरी घ्यावा. कारण या करिता आमदारांनी वेळ काढुन तालुक्यातील रस्ते, वीज, पुल शिक्षण आरोग्य आदी मुलभुत सुविधा उपलब्ध होतात की नाही. या करिता विशेष धोरण राबाविण्याची गरज असुन, या करिता विद्यमान आमदारानी या करिता वेळ देणे महत्त्वाचे आहे अस जनतेत चर्चिल्या जात आहे.
