
नांदेड। देशात व महाराष्ट्रात सध्याला पुन्हा करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे बघण्यात, वाचण्यात व ऐकण्यात येत आहे. केंद्र शासनाने देशातील सर्व राज्य शासनास सतर्क राहण्यास व करोना प्रतिबंधात्मक आचारसंहिता पाळण्यास सांगीतले आहे. करोनाचे रुग्ण सोलापूर व नांदेडातही आढळून आले आहेत.


सद्याला उन्हाचा पारा रोजच्या रोज वाढतच आहे. नागपूर, चंद्रपूर, अम्रावती, अकोला, परभणी, नांदेड, बिड हा अतिउष्णतेचा पट्टा सर्वज्ञात आहे. सनस्ट्रोक अर्थात उष्माघाताचे अनेक जिवघेने प्रकार इथे घडू शकतात नव्हे घडण्याची दाट शक्यता आहे.


उष्माघात भर उन्हात काम करणार्या शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर, कामगार, विट भट्टीकामगार, कारखाण्यातील, रस्त्याचे खोदकाम करणारे, गिट्टी फोडणारे, होम गार्डस्, ट्रॅफिक पोलिस, बंदोबस्तावरील महिला-पुरूष पोलिस व पोलिस ऑफिसर्स, फेरीवाले गंवडी, लोहार व हातगाड्यावरील कामगार आदिंना होण्याची जास्त शक्यता असते.


अशा व्यक्तींसाठी उष्माघात व करोनाही टाळता यावा, त्यांचा प्रतिबंध करता यावा आणि प्राणहानीही टाळता यावी म्हणून नांदेड शहरात वैद्य रूग्णालय व सिडको हडको भागातील जनतेसाठी होमिओपॅथिक महाविद्यालयात सिडको येथे होमिओपॅथिक औषधाचे दररोज सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत विनामुल्य वाटप करण्यात येत आहे. गरजू जनतेने या संधीचा फायदा घ्यावा, असे आवाहन नांदेडभूषण डॉ.हंसराज वैद्य यांनी केले आहे.
