
अर्धापूर| तालुक्यातील मौजे चोरंबा (नां) तीर्थक्षेत्र श्री जेजुरी ठाण येथील नवसाला पावणारा खंडेश्वर देवस्थान समितीच्या वतीने यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. पालखीच्या दर्शनासाठी वेग वेगळ्या जिल्ह्यातून हजारोंच्या संख्येने भाविक भक्तांनी दर्शन घेतले आहे.


अर्धापूर तालुक्यातील चोरंबा (नां) येथे दरवर्षी प्रमाणे तीर्थक्षेत्र श्री जेजुरी ठाण खंडेश्वर देवस्थान समितीच्या वतीने यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. पंचक्रोशीत हे देवस्थान असुन, नवसाला पावणारा खंडोबा म्हणून प्रसिद्ध आहे. त्यामध्ये विशेष म्हणजे भर दुपारी १२ वाजता श्री खंडेश्वराची पालखीची गावातून मिरवणूक काढली जाते. या पालखीच्या दर्शनासाठी वेग वेगळ्या जिल्ह्यातून हजारोंच्या संख्येने भाविक भक्त येतात व आपला नवस पूर्ण करण्यासाठी भाविक पालखी अंगावरून जाण्यासाठी हजारो भाविक रोडवर झोपतात. त्यांच्या अंगावरून पालखीसह पालखीतील भक्तजन अंगावरून प्रवास करतात. या यात्रेचे विशेष कौतुक केलं जाते सायंकाळी 5 – 6 वाजता शेंडिने गाड्या ओढतात व रात्री 3 दिवस जागरण असतात. यात्रेनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन गावकऱ्यांनी केले आहे.


यामध्ये शंकरपट, कुस्त्या व क्रिकेट असे कार्यक्रम घेण्यात येत आहेत. खंडेश्वराचे दर्शन घेण्यासाठी लोकप्रतिनिधींनीही उपस्थिती लावली होती. यामध्ये हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार माधवराव पाटील जवळगावकर, माजी जिल्हा परिषद सदस्य गंगाप्रसाद काकडे, शिवसेना माजी जिल्हाप्रमुख बाबुराव कदम कोहलीकर, काँग्रेस तालुका अध्यक्ष आनंद भंडारे, मनोज लद्दे, गोविंद भरकड, महेश देशमुख, गणपत सोळंके, चोरंबा नगरीचे सरपंच गिरजाराव पाटिल नरोटे, पोलिस पाटील अंजानराव नरोटे, बाळासाहेब देशमुख, गोरखनाथ कस्तुरे, हणमंतराव देशमुख, आकाश गिरी, राजेश बाजगिरे माळसाकांत कानोडे, लोभाजी कानोडे, सुभाष नरोटे, यादव कानोडे, हारजी नरोटे, माधव कानोडे , देवराव कानोडे रामदास फुलेबोइंवाड, केशव पांचाळ, दत्ता नऱ्हे, माधवराव देशमुख , प्रदीप पाटील नरोटे, रमेश जाधव, गजू पाटिल नरोटे, बिबिषण नरोटे, प्रविण देशमुख, निलेश देशमुख व परिसरातील शंकर पटप्रेमी ,क्रिकेट प्रेमिंनी, भाविक भक्त व गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

