
विदर्भ मराठवाडा ह्या एकाच नाण्यांच्या दोन बाजु, दोन्हींच्या मध्ये पावसाळ्यात मनमुराद पणे विक्राळ रूप धारण करून, हिवाळ्यात खळखळुन वाहत, उन्हाळ्यात इसापुर धरणाच्या पाण्यासाठी वाट पाहत थांबलेली कोरडीठाक पैनगंगा नदि, याच नदिच्या पलीकडे भरगच्च दिसणाऱ्या हिरव्या कच्च पिवळया शेंदरी गर्द फळांनी लदबदलेल्या संत्रा मोसंबीच्या बागा त्यावेळी विदर्भाचा कॅलिफोर्णीया असही म्हटल जायच, आता काळओघात फळ बागा दिसेनासा झाल्यात, विदर्भ मराठवाड्यात सगे सोयऱ्यांची ये जा नित्याचीच, विद्यार्थी-विद्यार्थिनींची शाळा, सासुरवासींनी माहेराशी, माहेच्या लेकीच सासराशी भेटीगाठीचा प्रवास ऊन पाऊस वारा कधी थांबलेला नाही, फरक येवढाच अगदी हाकेच्या अंतरावरचा प्रवास पन्नास किलोमीटरने वाढुन असायचा, जर जायचच असेल तर जीवावर उध्दार होवुन जीव धोक्यात घालुन लाकडी तराफयातुन नदि पार करत जायच, चिखलाने माखलेले अरूंद पांदन रस्ते, वाहना विना बैलगाडीचा प्रवास, हि परवड गत स्वातंत्रयोत्तर काळात सात दशका पासुन सुरू होती, या दरम्यान सोळा खासदार, तेरा आमदार होऊन गेले, सन २००४ व २००९ ला जिल्हयाला मुख्यमंत्री अशोक चव्हाणांच्या रूपान मुख्यमंत्री मिळाला होता परंतु पुलाची असनारी मागणी लाल फितीत अडकुन राहिली, पैनगंगा नदिवर पक्का मजबुत पुल नसल्यामुळे शाळकरी मुली, माता भगिनींची होणारी कुचंबना २०१९ ला खासदार हेमंत पाटिल यांच्या लक्षात काही सुज्ञ प्रतिष्ठीत नागरीक कार्यकर्त्यांनी आनुन दिली, पाहिल्या क्षणीच पाठपुरावा सुरू केला पुलाच्या कामासाठी २३ कोटी रूपयाचा निधी मंजुर करून आनला आजघडीला कंत्राट सुटून प्रत्यक्ष कामाला सुरूवात झालेली आहे. त्यांच नाव विरोधक, पक्षप्रेमी, ज्यांचा राजकारणाशी तीळमात्र संबंधनाही, सर्वसामान्य नागरीक, विद्यार्थी, विद्यार्थींनी, महिला भगिनी आपुलकीन घेत आहेत.


हिमायतनगर तालुक्यातील दिघी गाव तस आडवाटेच, तालुक्याच्या उत्तरे कडिल वायव्य दिसेला असलेल शेवटच टोक, येथे पोहचायच झाल की लोकांना जीवावर जायच, पावसाळ्यात चिखल, हिवाळ्यात रस्त्यांची तीच अवस्था, उन्हाळ्यात धुळीचा त्रास, कुठुनही गेल तरी प्रवास त्रास दायकच असायचा, हि एका गावची समस्या नव्हती वाघी, विरसणी, टेंभुर्णी, दिघी, घारापुर हि गाव रस्त्याअभावी विकासा पासुन कोसो दुर लोटलेली, रात्री अपरात्री गरोदर महिला, रूग्णांना दवाखाण्यात जीवंतपणीच खाटेवरून चौघाच्या खांद्यावर शहरात न्याव लागायच, कित्येकांनी पोहचण्या पुर्वी वाटेतच प्राण सोडले हि वास्तविकता आहे. तसा तो कॉंग्रेसचा बालेकिल्लाच, त्याच पुढाऱ्यांकडुन दुर्लक्षीत राहिला. केंद्रात मोदी सरकार आल्यानंतर या गावाच्या बाजुने राष्ट्रीय महामार्ग क्र. ७५१ आय प्रस्तावित केला, त्याच काम अंतिम टप्प्यात आहे. यामुळे सत्तर वर्ष रस्त्याचा वनवास भोगलेली पंचक्रोषी थेट राष्ट्रीय महामार्गावर आली, देशाशी जोडली गेली.


पैनगंगा नदिच्या तीरावरील दिघी तस धार्मिक रूपाने समोर आलेल गाव, श्री दत्तात्र्य संस्थानमुळे नावारूपास आलेल, येथिल यात्रा काळात परंपरेप्रमाणे आजही सव्वा खंडी गव्हाच्या पुऱ्या करून महाप्रसाद रूपात पंचक्रोषीतील भक्तगणांच्या पत्रावळी उडवल्या जातात. विदर्भ, तेलंगाणा राज्यातुन भक्तगण येथे मोठ्या संख्येने येतात. गावात सर्व जातीधर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतात. पाचवी पर्यंत जिल्हा परीषदेची शाळा आहे, शहराच अंतर बारा किलोमीटरच, नदिच्या पलीकडे विदर्भातील चातारी ता. उमरखेड अंतर अगदी दोन किलोमीटर पैनगंगा नदि ओलांडली की चातारीचा शिवार लागतो, विदर्भातील शाळा उष्णतेमुळे उशीरा उघडतात जेंव्हा शाळा सुरू असतात तेंव्हा पासुन नदिला पाणी असते, नैसर्गिक प्रवाह सुरू झाला कि नदित उतरता येत नाही, मग पुर असो की नदि भरलेली विद्यार्थ्यांचा रूकावरून शाळेचा प्रवास सुरू होतो.


रात्री अपरात्री आजारी व्यक्तीला दवाखाण्यात न्यायच झाल की नदि पात्रातुन रूकातुनच जायच, हे सगळ अंगवळनी पडलेल, मात्र जीवावर बेतनार, पाहणाऱ्याच्या जीवाचा थरकाप उडवनार दृश्य असायच, रूक चालवनारा व्यक्ती मच्छीमाराने आळस केला किंवा परगावी गेला तर कामांचा खोळंबा व्हायचा, अस कधी एखाद वेळी व्हायच, व्यवसायाने मच्छीमार असनारे चौघे जन आळी पाळीने रूक चालवायचे, हि त्यांच्या दोन पिढ्या पासुन रूक चालवण्याची परंपरा आहे. रूक चालवण्या व्यतिरीक्त मासेमारी चालते, रूका वरून प्रवास करणार्या व्यक्ती, विद्यार्थ्यांच्या प्रवासा च्या मोबदल्यात बलुते दारीतुन धान्य देतात, सनावाराला काही इनाम देवुन ग्रामस्थ खुश करतात. दररोज पस्तीस शाळकरी मुला, मुलींची ते ने आन करतात सध्या रंगराव देवघडे रूक चालवतात. नुसती विद्यार्थ्यांची ने आन करत नाहीत तर विदर्भाचे मराठवाड्यात, मराठवाड्याचे विदर्भात सोईरपनाचे नाते घट्ट आहेत, माहेरवाशीनच सासरी, सासरवाशीन माहेरी जान, लग्नाच वऱ्हाड रूकातुनच जायच, सर्व अनेक दशकांपासुन चालत आलेल.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत तरूण विकास प्रेमी खासदार हेमंत पाटिल यांना लोकांनी भरघोस मताधिक्य देवुन लोकसभेच प्रतिनिधीत्व करण्याची संधी दिली, याच संधिच सोन करण्यासाठी ग्रामस्थ एकवटले, ऑगष्ट २०१९ खासदार हेमंत पाटिल यांचे कडे पुलाच्या मागणीसाठी निवेदन, प्रकाशीत बातम्या, वास्तविक ह्रदयाला थरकाप सुटनारे व्हिडीओ दाखवुन पाठपुरावा करण्यास वृध्द तरूण रहिवाशांनी विनंती केली, हाती घेतलेल सार्वजनिक हिताच काम खासदार हेमंत पाटिल यांनी कधी बाजुला सारल नाही ते यांच कस राहिल, नेतेगणांच्या भेटीगाठी घेवुन मागणी लावुन धरली, पुलाच्या मागणीचा खासदार पाटिल यांनी पाठपुरावा केला तो मंजुर झाला. या पुलासाठी तब्बल २३ कोटी रूपयाचा निधी मंजुर करून घेतला आज घडीला पर्यायी पुल तयार करून नविन पुलाच्या कामास सुरूवात झालेली आहे. चातारी-दिघी पैनगंगा नदितील पर्यायी मार्गावरून हजारो दुचाकी, शेकडो मोठी वाहने ये जा करत आहेत.

खासदार हेमंत पाटिल यांच्यामुळे विद्यार्थ्यांचा जलमार्गावरील प्रवास, हजारो माहेरच्या लेकी, सासुरवासीनींच्या नातलगांना भेटीगाठीतील दोन राज्यांना जोडनारा खडतर मार्ग यापुढे सोपा झाला आहे त्यांना या भागातील समस्त नागरीक महिला मनोमन आशिर्वाद देत आहेत, त्यांच नाव घराघरात घेत आहेत…

लेखक….. गोविंद गोडसेलवार सरसमकर, हिमायतनगर, मो. 9921080887 , 9922239929