
नवीन नांदेड। श्री शनि मंदिर देव व श्री संकट मोचन हनुमान मंदिर देवस्थान इंदिरा गांधी गृहनिमार्ण सोसायटी, हडको नांदेड येथे श्री हनुमान जन्मोत्सव मोठया ऊत्साहाने शनिवार ०६ एप्रिल २०२३ रोजी साजरा करण्यात आला यावेळी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सामुदायिक अभिषेक, व महाप्रसाद आयोजन करण्यात आले होते.


दरवर्षी प्रमाणे याही २० वर्षी श्री संकटमोचन हनुमान जयंती सोहळा निमित्ताने ६ एप्रिल २०२३ रोजी गुरुवार सकाळी दहि दुधाचा सामुदायीक महाअभिषेक, गुरु श्री शशिकांत महाराज यांच्या अधिपत्याखाली संपन्न झाला तर हनुमान चालीसा व श्री शनि चालीसाचे वाचन, महाआरती, अजिवन अधिक यजमान श्री शिवसांब आनेराव, रंगनाथराव आष्टुरकर, करणसिंह ठाकुर, कै. सदाशिव बंडेवार, श्रीकांत शेषेराव देशपांडे, गंगाधर नागनाथ चालीकवार यांच्या व महाराष्ट्र गवळी समाजाचे नांदेड जिल्हा अध्यक्ष पवन गुरूखुदे यांच्या विशवस्त समितीचा वतीने दस्ती नारळ पुषष्हार देवून सन्मान करण्यात आला ,यावेळी
अजिवन अन्नदाते यांच्या हस्ते महाप्रसादाचे वाटप दुपारी १२ वाजता करण्यात आले.


यावेळी माजी नगरसेवक प्रा.अशोक मोरे, करणसिंह ठाकुर,निवृत्ती जिंकलवाड, डॉ. विजयानंद भोंग,वसंतराव बोरलेपवार, केशवराव वानखेडे,किशनराव ठिगळे, विजयराव पल्लेवाड, संतोष पबीतवार, शिवाजी पा. घोगरे,श्रीमती प्रयागबाई बळराम टेहरे,रमेशराव शिंदे, राधेशाम भारतीया,संतोष आनंदराव पांडे, आनंदराव वासरीकर,शेषेराव व्यंकटराव शेटे, सतिश बाळासाहेब मोरे, शंकरलालजी धुत, गंगाधर नागनाथ चालिकवार, विश्वनाथ ढगे वजीरगांवकर, आशिष कहाळेकर, शैलेंद्र वट्टमवार, शिवानंद बंडु वट्टमवार, संजय सितारामजी जाजू (सी.ए, नांदेड) सौ. सपना शामसुंदर छत्रकर, बालाजी नागनाथ वडगवकर, किरण शेषाद्री मंचीवार, शशांक विजय वट्टमवार यांच्या हस्ते महाप्रसाद वाटप करण्यात आला.


या सोहळा यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष करणसिंह ठाकुर (सिडको भुषण) माधवराव कदम सेक्रेटरी ,गोपिनाथराव कहाळेकर कोषाध्यक्ष संजय जाधव पाटील बांधकाम प्रमुख आर. किशनराव, बाळासाहेब चव्हाण, त्र्यंबक सरोदे, दत्तात्रय सागुरे, शिवाजी आढाव देवबा कुंचेलीकर, प्रा. अशोक मोरे, निवृत्तीराव जिंकलवाड, किशोर देशमुख, खुशाल कदम यांनी परिश्रम घेतले.
