
लोहा। स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेचा समारोप लोह्यात गुरुवारी रात्री समारोप झाला .सावरकर देशभक्त होते .पण कॉग्रेस पक्ष व नेते सातत्याने त्याच्या विषयी अपशब्द बोलत आहेत. जनतेनी असा विचार वृत्तीना लोकांना ओळखले पाहिजे आपण सर्वांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत राहावे तसेच राज्यात भाजपा – शिवसेना सरकार जनतेच्या हिताचे निर्णय घेत आहेत. आपण त्यांच्या सोबत खंबीरपणे उभे राहावे आवाहन भाजपा सरचिटणीस व गौरव यात्रेचे प्रमुख प्रवीण पाटील चिखलीकर यांनी केले.


डॉ माधव उच्छेकर यांनी सावरकरां विषयी अभ्यास पूर्ण विचार मांडले. भाजपा युवा नेते प्रवीण पाटील चिखलीकरांच्या नेतृत्वाखाली दोन्ही तालुक्यातील 42 गावातून तसेच कंधार शहरातून गौरव यात्रा निघाली व लोह्यात समारोप झाला. समारोपाच्या कार्यक्रमा साठी भाजपाचे जेष्ठ सरचिटणीस डॉ. माधवराव उच्चेकर, सरचिटणीस प्रवीण पाटील चिखलीकर, भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षा प्राणिता ताई चिखलीकर, माजी नगराध्यक्ष भाजपा शहराध्यक्ष किरण वटटमवार, तालुकाध्यक्ष आनंदराव पाटील ढाकणीकर ,माजी सभापती बंडू पावडे, उपनगराध्यक्ष दता वाले, माजी उपनगराध्यक्ष केशवराव मुकदम , छत्रपती धुतमल, भास्कर पाटील पवार, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष मिलिंद पाटील पवार, भाजपा तालुकाध्यक्ष भगवान राठोड, माजी उपसभापती नरेंद्र गायकवाड, साईनाथ कोळगिरे, शोभाताई बगडे सुनिता, स्वाती शितल नय्यर, शहर प्रमुख युवराज वाघमारे , सचिन मुकदम झदीपक कानवटे ओबीसी तालुका अध्यक्ष अर्जुन राठोड भाजपा उद्योग कांता बिडवई , अनिल धुतमल अंबादास पवार, बाळा पवार अविनाश पाटील पवार यांची उपस्थिती होती.भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा प्रणिता ताई देवरे चिखलीकर भगवान राठोड यांनी भाषणे झाली तर डॉ. उच्चेकर यांनी सविस्तर मार्गदर्शन केले संचलन नगरसेवक भास्कर पवार यांनी तर आभार शिवसेनेचे उपप्रमुख मारुती एजगे यांनी केले.


भाजपा नगराध्यक्ष यांनी अनुउपस्थिती
भाजपा च्या चिन्हावर जनतेतून निवडून आलेले लोह्याचे नगराध्यक्ष गजानन सूर्यवंशी यांनी लोह्यात स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा समारोप झाला. नगरपालिका कार्यालया समोर त्यांनी पुष्पहार टाकला पण समारोप कार्यक्रमास उपस्थिती दर्शविली नाही .पक्षाच्या कोणत्याच कार्यक्रमात कधीच सक्रिय नसलेल्या या नगराध्यक्ष याचा कार्यकाळ आता केवळ सहा महिने राहिला आहे (?) याची चर्चा सुरू झाली.