
नायगाव, रामप्रसाद चन्नावार। भारतीय जनता पक्षाचा चा वर्धापन दिवस संपूर्ण देशामध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी नायगाव येथे भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य बालाजी बच्चेवार यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या निवासस्थानी जेष्ठ नागरिकांचा सत्कार करून व विविध क्षेत्रात कार्य केलेल्या व्यापाऱ्यांचा व शेतकऱ्यांचा सत्कार करून सन्मान करण्यात आला.


यावेळी सन्मान करण्यात आलेल्या मान्यवरांमध्ये शेतकरी संघटनेचे नेते व्यंकटराव पाटील वडजे व्यापारी क्षेत्रात उत्तुंग कार्य करणारे बालाजी सावकार आरगुलवार उत्तम सावकार वट्टमवार संभाजी पाटील कुष्णूरकर बालाजी पाटील अंतरगावकर राघव पाटील चव्हाण रमेश सावकार मेडेवार आनंदवन महाराज घोटाळकर आदी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला यावेळी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारणी सदस्य बालाजी बच्चेवार शहराध्यक्ष शंकर पाटील कल्याण भगवानराव पाटील लंगडापुरे जेष्ठ कार्यकर्ते व्यंकटराव पाटील चव्हाण नगरसेवक चंदू पाटील चव्हाण उद्योजक शिवाजी पाटील वडजे शंकर वडपत्रे श्रीराम सेठ पत्तेवार ईत्यादी उपस्थिती होते.

