
नवीन नांदेड। सिडको हडको परिसरातील हनुमान मंदिर येथे ६ एप्रिल२३ रोजी हनुमान जन्मोत्सवा निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रम व महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.


दरवर्षी प्रमाणे याही वर्षी हनुमान जन्मोत्सवा मोठया उत्साहात साजरा करण्यात आला, यावेळी विधीवत पुजन करून हनुमान चालीसा पठण, भजन कीर्तन यासह विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते, हडको येथील जाज्वल्य हनुमान मंदिर येथे नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार मोहनराव हंबर्डे यांनी भेट देऊन दर्शन घेतले, यावेळी विशवस्त मंदिर समितीच्या वतीने सतिश भेडेकर,बंजरग भेडेकर, गजानन कहाळेकर व विशवस्त पदाधिकारी यांनी आ. मोहनराव हंबर्डे यांच्या सत्कार करण्यात आला, तर ऊस्मानगर रोडवरील बिजली हनुमान मंदिर येथेही हनुमान विधीवत महा अभिषेक,महापूजा करूनजन्मोत्सव साजरा करण्यात आला यावेळी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले, ईच्छा पुरती हनुमान मंदिर हडको, सिडको येथील हनुमान मंदिर, येथे ही जन्मोत्सव निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.


संभाजी चौक परिसरातील काळा हनुमान मंदिर येथे हनुमान जन्मोत्सवा निमित्ताने महोत्सव सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आला असुन ६ एप्रिल रोजी सकाळी विधीवत पुजा,महाअभिषेक व काल्याचे किरतन हभप आंनद महाराज अंतरगावकर याचे झाले. यावेळी महाप्रसाद आयोजित करण्यात आला होता,हा सोहळा यशस्वी करण्यासाठी दक्षिण मुखी काळा हनुमान भक्त मंडळी व आदर्श युवक मंडळ यांनी परिश्रम घेतले,तर एम. आय.डी.सी.तिन शिव हनुमान मंदिर, भायेगाव येथेही हनुमान जन्मोत्सव अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आयोजित करण्यात आला असुन हनुमान जन्मोत्सव ऊत्साहात साजरा करण्यात आला.


यावेळी संरपच प्रतिनिधी बालाजी पाटील भायेगावकर यांच्या वतीने महाप्रसाद वाटप करण्यात आला, ग्रामीण व शहरी भागातील अनेक ठिकाणाचा हनुमान मंदिरात जन्मोत्सव ऊत्साहात परिसरातील विविध ठिकाणी हनुमान जन्मोत्सवा मोठया उत्साहात साजरा करण्यात आला, यावेळी परिसरातील महिला नागरीक भाविक भक्त मोठया संख्येने उपस्थित होते.
