
नायगाव, रामप्रसाद चन्नावार| नायगाव तालुक्यातील हिप्परगा जा. जिल्हा प्राथमिक शाळेचे उपक्रम शील मुख्याध्यापक श्नी.माधव वटपलवाड यांच्या वाढदिवसानिमित्त हिप्परगा जा. येथील जि.प.प्रा.शाळेच्या ग्रंथालयास 61 विविध प्रकारच्या पुस्तकांची भेट दिली.


शाळेत पहिले ते सातवी पर्यंतच्या 180 विध्यार्थीना ज्ञानाचे अमृत पाजवण्यासाठी शाळेतील ग्रंथालयात या पुर्वी 300 च्या जवळपास विविध प्रकारचे पुस्तके शाळेत उपलब्ध आहेत.त्यात अजून काही तरी भर पडावी म्हणून 61 विविध प्रकारचे पुस्तके भेट देऊन वाढदिवसानिमित्त एक आगळावेगळा उपक्रम राबवला. यावेळी शाळेतील त्यांचे सहकारी श्री.यलपलवाड सर.यमलवाड सर.म्याकलोड सर.गायकवाड सर.पचलिंग सर.सौ.शिंगडे मॅडम व शाळेतील चिमुकले विद्यार्थ्यानी शुभेच्छा दिल्या.


अलीकडील काळात अनेकांचे वाढदिवस साजरे होतात त्यातून अवाढव्य कितीतरी रुपयांचा खर्च होतो, पण असे पवित्र काम ज्यांनी केले एवढे कौतुकास्पद आहे व शालेय विद्यार्थ्यांची वैचारिकता वाढण्यासाठी असे उपक्रम महत्त्वाचे आहेत.