
नवीन नांदेड। मौजे भायेगांव ता. जि. नांदेड अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याला ४ ते ११ एप्रिल दरम्यान आयोजित करण्यात आले असून ११ एप्रिल रोजी हभप भाऊसाहेब पावडेवाडीकर यांच्ये काल्याचा किर्तनाने या सोहळ्याची सांगता होणार आहे.


वै. हभप मामा साहेब महाराज मारतळेकर, वै. हभप नारायण महाराज वडगावकर, वै. माधवराव गुरूजी, वै. माणिकराव महाराज सिडकोकर यांच्या कृपाशीर्वादाने व श्री हभप भाऊसाहेब महाराज पावडेवाडीकर यांच्या मार्गदर्शनाने अखंड हरिनाम सप्ताह ४ ते ११ एप्रिल या कालावधीत संपन्न होत आहे.


सप्ताहातील दैनंदिन कार्यक्रम पहाटे काकडा भजन, ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन, संत तुकाराम चरित्र, हरिपाठ, रात्री बारा किर्तनामे होणार आहे, यात हभप हारी महाराज धानोरकर,हभप ज्ञानेश्वर महाराज कांकाडीकर, हभप हारी महाराज मारकडकर, हभप कोंडीबा महाराज पासदगावकर, हभप चंद्रकांत महाराज ऊस्मानगरकर, हभप व्यंकट महाराज एकलारकर, हभप बाबु महाराज कांकाडीकर, यांच्या आयोजित करण्यात आले आहे.


या सोहळ्याला भजनी मंडळी तुप्पा वाहेगाव, काकांडी, मारतळा , वडगाव, जाभरून, किक्की, देवापूर पिंपळगाव मिश्री, हिदोंळा, खारगाव, धानोरा मोत्या येथील भजनी मंडळ यांच्या सहभाग राहणार असून या सोहळ्याला भाविक भक्तांनी उपस्थित राहण्याचे आवाहन भायेगाव समस्त गावकरी मंडळी यांनी केले आहे.
