
नांदेड| ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन दिल्ली च्या आदेशान्वये एमजीएमचे अध्यक्ष कमलकिशोर कदम यांच्या सूचनेनुसार महाविद्यालयाच्या अँटी रॅगिंग कमिटीवर नांदेडचे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी विमानतळ पोलिस स्थानकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय जाधव यांचे नियुक्ती आदेश काढले आहेत.


तर माध्यम प्रतिनिधी म्हणून दैनिक लोकपत्र नांदेड चे जिल्हाआवृत्ती संपादक डॉ. गणेश जोशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही समिती एमजीएम अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संचालिका डॉ. गीता लाटकर यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार आहे..

