
लोहा| येथील श्री संत गाडगे महाराज विद्यालयातचे पर्यवेक्षक व क्रीडा शिक्षक बी डी जाधव यांची संस्थेने उपमुख्याध्यापक म्हणून पदोन्नती दिली आहे.कंधार येथील श्री शिवाजी हायस्कुल येथे त्यांना पदस्थापना देण्यात आली आहे.


क्रीडा शिक्षक व बाणेदार स्वभावाचे बी डी जाधव हे डिसेंबर १९९० मध्ये श्री संत गाडगे महाराज विद्यालयात ते शिक्षक म्हणून रुजू झाले. क्रीडा शिक्षक म्हणून अनेक विद्यार्थी राज्य व राष्ट्रीय स्तरावर हॉलीबॉल, बास्केटबॉल या खेळात चमकले आहेत .जुलै २०१६ मध्ये त्यांना पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती दिली आणि आता त्याचे संस्थे अंतर्गत कंधार येथे उपमुख्याध्यापक म्हणून पदोन्नती देण्यात आली आहे.


श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे संस्थेचे अध्यक्ष प्रा डॉ पुरूषोत्तम धोंडगे, सचिव माजी आ भाई गुरुनाथराव कुरुडे,सहसचिव ऍड मुक्तेश्वर धोंडगे यांनी त्यांना पदोन्नती दिली. यापूर्वी त्याचे वर्गमित्र आय बी शेटे, अनिल जाधव यांनाही उपमुख्याध्यापक म्हणून पदोन्नती मिळाली तिन्ही मित्र आता उपमुख्याध्यापक झाले आहेत हा योगायोग होय.


या नियुक्ती बद्दल संस्थेचे अध्यक्ष प्रा डॉ पुरूषोत्तम धोंडगे, सचिव भाई गुरुनाथराव कुरुडे, सहसचिव ऍड मुक्तेश्वर धोंडगे, प्राचार्य डॉ अशोकराव गवते,प्रा डॉ डी एम पवार, शाळेचे मुख्याध्यापक बोधगीरे,प्रा येसलवाड, प्रा तेलंग, हरि पाटील शिंदे, प्रा बालाजी पवार, प्रकाश जीरेवार, लुंगारे, मुख्याध्यापक लुंगारे, शशिकांत पाटील सहकारी शिक्षक, तसेच मित्रपरिवार यांनी बी डी जाधव यांचे अभिनंदन केले आहे.
