
नवीन नांदेड। डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यी जयंती आपल्याला माणूस म्हणून जगण्याची हिमंत व किंमत मिळाली म्हणुन अभिमानाने हा उत्सव साजरा करून पोलीस प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ सिध्देश्वर भोरे यांनी ग्रामीण पोलीस स्टेशन येथे आयोजित उत्सव समितीच्या बैठकीत केले.


ग्रामीण पोलीस स्टेशन येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने उत्सव समितीच्या बैठकीचे आयोजन ७ एप्रिल रोजी करण्यात आले होते, या बैठकीस उपविभागीय अधिकारी डॉ. सिध्देश्वर भोरे, पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड,सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश थोरात, उपनिरीक्षक बुकतरे, यांच्या सह वंचित बहुजन आघाडीचे महानगर अध्यक्ष विठ्ठल गायकवाड,माजी नगरसेवक सिध्दार्थ गायकवाड,अशोक मगरे,चाकुरकर, राजु लांडगे, डॉ.नरेश रायेवार,व्यंकट इंगळे, राज्यपाल पुरस्कार प्राप्त खंडेराव बकाल, पोलीस पाटील प्रतिनिधी खोसडे पाटील, बालासाहेब सुर्यवंशी, सौ.अरूणा गजानन ठोके, संजय यन्नावार, ग्रामपंचायत सदस्य गफुरसाब, शेख अस्लम, अमृत नंरगलकर, व भिम जयंती मंडळाचे विविध भागातील अध्यक्ष पदाधिकारी यांच्यी उपस्थिती होती.


यावेळी पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती अगोदर प्रत्येक विभागातील भागातील दारू पिऊन गौधंळ घालणारा संबंधित ईसमास जयंती मंडळ तर्फे नावे दिल्या नंतर त्यांचावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगून डिजी मुक्त, शांततेत व ऊत्साहात साजरी करावी असे आवाहन पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांनी केले.


यावेळी डॉ.नरेश रायेवार,राजु लांडगे, विठ्ठल गायकवाड, शेख अस्लम,अशोक मगरे, सुदर्शन गजभारे,जळबा सोनकांबळे, प्रा.ईरवंत सुर्यकांर, यांचे मार्गदर्शन पर भाषणे झाली यात मिरवणुकीसाठी मुख्य रस्ता काम चालू असल्याने ती तात्काळ करावे, पोलीस मित्र संकल्पना पुन्हा राबविण्यात यावी यासह अनेक मार्गदर्शन पर सुचना केल्या.

मनपा क्षेत्रिय कार्यलयाचे स्वच्छता निरीक्षक किशन वाघमारे यांच्या सह ग्रामीण हद्दीतील डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती मंडळ पदाधिकारी, जेष्ठ नागरिक, पोलीस पाटील,ग्रामपंचायत संरपच,सदस्य,पत्रकार, राजकीय पक्षाचे पदाधिकारी यांच्यी उपस्थिती होती.ही उत्सव समिती बैठक यशस्वीतेसाठी गोपनिय शाखेचे चंद्रकांत बिरादार यांनी परिश्रम केले.
