
लोहा| तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुखांनी बीआरएस पक्षात प्रवेश केल्या मुळे या पक्षात मोठी पोकळी निर्माण झाली. पण राजकीय दृष्टया मोठा अनुभव असलेले जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर यांनी पक्षात नव्या व प्रभावी कार्यकर्त्यांना प्रवेश देण्यास सुरुवात केली आहे. लोहा शहरात व तालुक्यात आक्रमक अशी ओळख असलेले धडाडीचे माजी नगरसेवक रमेश माळी यांनी आज जिल्हाध्यक्ष भोसीकर यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला त्यामुळे लोह्यात पक्षाला चांगलीच ताकद मिळणार आहे.


माजी नगरसेवक रमेश माळी हे २००८ते २०१३ पर्यंत नगरसेवक होते. त्यानंतर त्यानंतर त्यांनी २०१८ मध्ये थेट जनतेतून नगराध्यक्ष पदाची अपक्ष म्हणून निवडणूक लढविली होती. तालुक्यात व शहरात त्याचा दांडगा संपर्क आहे. जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील आहेत माजी नगरसेवक रमेश माळी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये जिल्हाध्यक्ष भोसीकर यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश केला.


पूर्वी त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्या समता परिषदेत काम केले होते. प्रवेशाच्या वेळी जिल्हा उपाध्यक्ष सुभाषराव गायकवाड राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस प्रा. जांभरुणकर ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष रामचंद्र येईलवाड, रायुकॉ तालुकाध्यक्ष शिवराज पाटील चितळीकर कंधार कृउबा समितीचे संचालक अंगद केंद्रे , कंधारच्या रायु अध्यक्ष माधव पाटील, रायुकॉ विधानसभा अध्यक्ष ऍड बंटी सावंत , संदीप पौळ यासह पदाधिकारी उपस्थित होते.

