
नांदेड| बदलत्या काळातील मानवी जीवनात सौंदर्य व सौंदर्यशास्त्राचे महत्व वाढत आहे. डॉ.पूजा नितीनसिंह हजारी यांचे हजारी स्कीन क्लिनिक नांदेडकरांच्या सौंदर्य समस्या दूर करेल असा विश्वास औरंगाबाद येथील प्रसिद्ध त्वचा रोग आणि सौंदर्यशास्त्र तज्ञ डॉ.सौ.प्रियंका व त्यांचे पती प्रसिद्ध हाडाचे व मणक्याचे सर्जन डॉ.अजयसिंह गौर यांनी व्यक्त केले.


येथील प्रसिद्ध डॉ.स्वरुपसिंह हजारी यांच्या स्नुषा डॉ.पूजा नितीनसिंह हजारी यांच्या हजारी स्कीन क्लिनीकचे उद्घाटन औरंगाबाद येथील त्वचा रोग व सौंदर्यशास्त्र तज्ञ डॉ.सौ.प्रियंका अजयसिंह गौर व त्यांचे पती हाडाचे व मणक्याचे सर्जन डॉ.अजयसिंह गौर यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रा.भीमरावजी चव्हाण, डॉ.दीपकसिंह हजारी, राजपूत समाजाचे दिलीपसिंह हजारी हे उपस्थित होते.


यावेळी बोलतांना डॉ.प्रियंका गौर म्हणाल्या की, मानवी जीवनात आता सौंदर्यशास्त्राला मोठे महत्व प्राप्त झाले आहे. सौंदर्यशास्त्रात नवनवीन तंत्रज्ञानावर आाधारीत उपचार पध्दती उपलब्ध झाली आहे. डॉ.पूजा नितीनसिंह हजारी ह्या अत्याधुनिक तंत्र व यंत्राच्या साह्याने नांदेडकरांच्या सौंदर्य समस्या निश्चित दूर करतील, असा विश्र्वास त्यांनी व्यक्त केला. डॉ.अजयसिंह गौर यांनी डॉ.स्वरुपसिंह हजारी यांनी मागील 40 वर्षांपासून सुरु केलेली रुग्णसेवेची परंपरा डॉ.पूजा व डॉ.नितीन हे पुढे घेवून जातील आणि रुग्णांना मोठा दिलासा देतील, असा विश्वास व्यक्त केला.


यावेळी प्रा.भीमराव चव्हाण यांनी माणुस स्वतःचे विचार आणि श्रमाने मोठा होतो. डॉ.हजारी हे रुग्णसेवेत श्रम घेवून मोठे झाले आहेत. श्रमाची परंपरा डॉ.नितीन आणि पूजा चालवत असल्याबद्दल प्रा.चव्हाण यांनी समाधान व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.पूजा नितीनसिंह हजारी यांनी तर सुत्रसंचालन ऍड.प्रदीप नागापूरकर व आभार प्रदर्शन दिलीपसिंह हजारी यांनी केले. यावेळी चुन्नुसिंह हजारी, दिगंबरराव कुंभार, माजी सरपंच दाजीबा पाटील येळे, संजय नागापूरकर, बालाजीराव कदम, दिगंबर पवार, साहेबराव उमाटे यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.
