Sunday, May 28, 2023
Home नायगाव कृ.उ.बा.समिती नायगाव हमाल मापारी मतदार संघातुन पंढरीनाथ भालेराव यांची बिनविरोध निवड -NNL

कृ.उ.बा.समिती नायगाव हमाल मापारी मतदार संघातुन पंढरीनाथ भालेराव यांची बिनविरोध निवड -NNL

by nandednewslive
0 comment

नायगाव, रामप्रसाद चन्नावार| कृषी उत्पन्न बाजार समिती नायगाव बाजार निवडणूक 2023 या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाचे नेते मा.आ. वसंतराव पाटील चव्हाण यांच्या गटाचे पंढरीनाथ भालेराव यांची बिनविरोध निवड झाली आहे.

भारतीय जनता पक्षाचे दोन आमदार व अनेक मातब्बर नेत्यांनी मोठा गाजावाजा करूनही निवडणुकीला उमेदवारी अर्ज दाखल केला नाही.त्यामुळे निवडणुकीच्या आधीच वसंतराव पाटील चव्हाण गटाच्या हमाल मापारी गटाचे उमेदवार पंढरीनाथ भालेराव हे बिनविरोध निवडून आले, त्यांचा यावेळी सत्कार करून भावी कार्यास शुभेच्छा देण्यात आलेल्या वेळी श्रीनिवास पाटील चव्हाण, विजय पाटील चव्हाण, रवींद्र पाटील चव्हाण, सुधाकर पाटील शिंदे, पांडू पाटील चव्हाण, संजय पाटील चव्हाण माणिक पा चव्हाण, विठ्ठल आप्पा बेळगे, कैलास कोलमवार, श्रीकांत भालेराव.साईनाथ चन्नावार. सोमनाथ बैलके.यासह अदीजन उपस्थित होते.

बिनविरोधपणे निवडून आलेले पंढरीनाथ भालेराव हे व्यक्तिमत्व सर्वांसाठी त्यातल्या त्यात विशेषतः हमाल मापारी लोकांसोबत न्याय देण्याच्या भूमिकेने पूर्वीपासूनच एकनिष्ठ पणाने कार्यरत असल्याने यांच्या विरोधात आपला निभाव लागणार नाही म्हणून कदाचित भाजपाने उमेदवारी दाखल केली नाही अशी चर्चा मात्र होत आहे.

संबंधित बातम्या वाचा

Leave a Comment

nandednewslive.com या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेत स्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Visitor counter NNL

Copyright @ 2011-2023 Online Social News Live Channel All Right Reserved -Developed & Designed by M&D Infotech Latur, Call – 86687 76434 

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
error: Content is protected !!