
उस्माननगर, माणिक भिसे| येथील मुस्लीम बांधवांच्या वतीने राष्ट्रीय महामार्गावरील उस्माननगर येथील मदीना नगर परिसरातील मदिना मजीदमध्ये दि.५ एफ्रील रोजी ईप्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.या ईप्तार पार्टीत हिंदू, मुस्लिम समाजतील तरूण , ज्येष्ठ नागरिक, कार्यकर्त्यांनी भरपूर प्रमाणात प्रतिसाद मिळाला असून या दरम्यान हिंदू बांधवांना ” ईश्र्वर और सृष्टी श्रेष्ठ कौन ” या पुस्तकाचे वाटप करण्यात आले.


यावेळी नांदेड येथील मर्कज मदीना मशीद येथील खालीदभाई यांनी मोहम्मद पैगंबर साहेब यांचे विचार व्यक्त केले. यावेळी उस्माननगर पोलिस स्टेशन चे सपो .उपनिरीक्षक पल्लेवाड , नितिन लाटकर ,खुशालराव पांडागळे , वैजनाथ पाटील घोरबांड , रामराव सोनसळे लाटकर ,संजय वारकड , दत्ता पाटील घोरबांड ,प्रा.विजय भिसे , गुणाजी वारकड , पत्रकार गणेश लोखंडे ,लक्ष्मण कांबळे , प्रदीप देशमुख,सलीम टेलर , बालाजी पुंडाजी घोरबांड , राहुल सोनसळे सर , केंद्रप्रमुख जयवंतराव काळे , एकनाथ केंद्रे, गंगाधर भिसे , कमलाकर शिंदे , यांच्या सह अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. या ईप्तार पार्टीत सामाजिक सलोखा कायम ठेवून सर्व बांधव एकत्र बसून ईप्तार पार्टीचा मनसोक्त आनंद लुटला.


मुस्लिम धर्मातील रमजान महिन्याला असाधारण महत्व आहे. रमजानच्या महिन्यात उपवासधारकांमध्ये आध्यात्मिक परिवर्तन होऊन मनामनातील स्नेहभाव, सद्भाव, संयम, त्याग, शांती, सहिष्णुता, चांगुलपणा, प्रामाणिकपणा माणसांच्या ठायी रुजवणारा माणसाला वाईटापासून, वासनेपासून शेकडो मैल दूर ठेवणारा या महिन्याचे महात्म्य, पावित्र्य सांगावे तेवढे थोडेच, कोणाच्या पोटातील भुकेची आग संपवणे तर पुण्य आहेच, पण रमजानमध्ये एखाद्या उपवासधारकाला जेऊ घालणे तर महा पुण्य आहे. या उद्देशाने ५ रोजी उस्माननगर राष्ट्रीय महामार्गावरील मदीना मशीद येथे मुस्लिम बांधवांच्या वतीने उपवासधारकांसाठी सामूहिक इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.मदीना मजीद मधील मुस्लिम बांधवांनी पुढाकार घेऊन या पार्टीचे आयोजनाचे नियोजन केले होते. उस्माननगर येथील असंख्य उपवासधारकांना इफ्तार व जेवणाचे आस्वाद घेण्याचे आवाहन मदीना नगर येथील मदीना मजीद येथे मौलाना यांच्या मार्गदर्शनाखाली मुस्लिम समाजतील बांधव यांनी केले होते.


नांदेड येथील मर्कज मदीना मशीद येथील खालीदभाई यांनी ईश्वर एकच आहे. आपण सर्वजन त्या ईश्र्वराचे लेकरं आहोत. मानवाची पुजा करण्यापेक्षा त्या ईश्र्वराची आराधना केली पाहिजे.असे सांगून रोजा विषयी अनमोल असे मार्गदर्शन केले.त्यानंतर गावातील उपस्थित नागरिकांचा मदीना मजीद तर्फे” गुलाब,हार , ईश्वर और सृष्टी श्रेष्ठ कौन ” हे पुस्तक देऊन सन्मानित करण्यात आले. इफ्तार पार्टी यशस्वी बनविण्यासाठी. जावेद नबीशहा मौलाना , शेख जलील ,शेख सत्तार ,हाफीज गौस ,आमिनशाह फकीर ,बाबू पिंजारी , शेख मुक्तार , शाहेद शहा , खाजा शादुल शब्बीर सुपेकर , सरवर आदमनकर , मनसुर मौलाना ,शेरू आदमनकर ,फयाज चिमेगावकर , सलीम पिंजारी ,मुंन्तलीफ पिंजारी बाबा गड्डेवाले , यांच्या सह मुस्लिम समाजतील तरूणांनी अथक परिश्रम घेतले.
